पिंपळनेरमध्ये १४ ते २१ नोव्हेंबर दरम्यान भक्तपंढरी सोहळा ! उपमुख्यमंत्री अजित दादा पवारांच्या उपस्थितीत रविवारी "संत नाळोबाराय अभंग गाथ...
पिंपळनेरमध्ये १४ ते २१ नोव्हेंबर दरम्यान भक्तपंढरी सोहळा !
उपमुख्यमंत्री अजित दादा पवारांच्या उपस्थितीत रविवारी "संत नाळोबाराय अभंग गाथा प्रकाशन"
अशोकराव सावंत यांची माहिती
पारनेर प्रतिनिधी :
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या शुभहस्ते रविवार दि.२१ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता श्रीक्षेत्र पिंपळनेरला श्री संत निळोबाराय महाराजांच्या "अभंग गाथा प्रकाशन" सोहळा व १ कोटी निळोबारायांचा वाडातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर जीर्णोद्धार कार्यक्रम आयोजित केला असल्याची माहिती स्वागताध्यक्ष आमदार निलेश लंके
देवस्थानचे अध्यक्ष ज्ञानदेव पठारे व कार्याध्यक्ष अशोक सावंत यांनी दिली आहे. जवळपास या संत निळोबाराय महाराजांच्या दिंडीला १२५ वर्षांची परंपरा असून पंढरपूर येथील आषाढी वारीत राज्यातील मानाच्या दिंडीमध्ये ९ वे स्थान
आहे.
या सोहळा निमित्ताने १४ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित भक्त पंढरी सोहळा ह.भ.प.डाॅ विकासानंद महाराज मिसाळ यांच्या नियोजनाखाली चालु आहे.१४ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर या कालावधीत राज्यातील नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन होणार आहे. यावेळी परिसरातील १ हजार भाविकांचे निळोबाराय गाथा वाचन, विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. २१ नोव्हेंबरला संत निळोबाराय महाराज अभंग गाथा प्रकाशन सोहळा, निळोबारायांच्या वाड्यातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या जीर्णोद्धाराचा प्रारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी ज्येष्ठ समाजेवक अण्णा हजारे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, चैतन्य महाराज देगलूकर आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी निळोबाराय यांचे वंशज व पालखी सोहळा प्रमुख गोपाळकाका मकाशीर, निळोबाराय ट्रस्ट अध्यक्ष ज्ञानदेव पठारे, सुरेश ज्ञानदेव पठारे अमोल पोटे सुभाष जपटे रामा वाघुले विजय गुगळे बाळासाहेब सावंत
अनिकेत दादासाहेब पठारे, चांगदेव शिर्के, लक्ष्मण खामकर, भाऊसाहेब लटांबळे, सरपंच सुभाष गाजरे, उपसरपंच अमोल पोटे, विजय गुगळे, संपत सावंत, अनिल पोटे, तुळशीराम कळसकर आदींनी या का कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले असून देवस्थानच्या वतीने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
देवस्थानच्या वतीने निळोबारायांच्या आता १ हजार ६०० अभंगाचे प्रकाशन..
संत परंपरेतील एक प्रमुख संत म्हणून समजल्या जाणाऱ्या संत निळोबाराय अभंगाचा गाथा सर्वप्रथम छापण्याचे कार्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे निकटचे सहकारी तुकाराम तात्या पडवळ यांनी सन १८९१ मध्ये केले. तर दुसरीकडे संत निळोबाराय अभंगवाणी आणि त्यांनी लिहिलेल्या तुकाराम स्तुतीतील काही अभंग अप्रकाशित आहेत. त्यामुळे सुरुवातीला निळोबारायचे १ हजार ४०० अभंगच पहिली आवृत्तीमध्ये प्रकाशित करण्यात आले होते. तर उर्वरित अभंग दुसरी आवृत्ती प्रकाशित करण्यात आले असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते १ हजार ६०० अभंग गाथा चे प्रकाशन रविवारी केले जाणार असल्याची माहिती कार्याध्यक्ष अशोक सावंत यांनी दिली आहे.
उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते आमदार निलेश लंकेना" कोव्हिड योध्दा"
कोरोना महामारी च्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंके यांनी गेल्या दिड वर्षाच्या कार्यकाळात हजारो रुग्णांना उपचार देऊन जीवन दान दिले. त्यामुळे कोरुना काळातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते आमदार निलेश लंके यांचा म्हणून विशेष " कोव्हिड योध्दा"
सन्मान करण्यात येणार असल्याचेही देवस्थानच्या वतीने सांगण्यात आले आहे.