सरपंच प्रकाश गाजरे यांचा दिवाळी निमित्त सामाजिक उपक्रम; आदिवासी कुटुंबांना करणार फराळ वाटप म्हसोबाझाप ग्रामपंचायत मध्ये ४ टन साखरेचे वाटप १०...
सरपंच प्रकाश गाजरे यांचा दिवाळी निमित्त सामाजिक उपक्रम; आदिवासी कुटुंबांना करणार फराळ वाटप
म्हसोबाझाप ग्रामपंचायत मध्ये ४ टन साखरेचे वाटप
१००० आदिवासी कुटुंबांना ही करणार फराळ वाटप
सामाजिक उपक्रम राबवत करणार दिवाळी साजरी
पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील म्हसोबा झापचे आदर्श व उपक्रमशील सरपंच प्रकाश गाजरे या दिवाळीमध्ये सर्वसामान्य नागरिकांना अनोखी भेट देणार असून आपल्या ग्रामपंचायत मधील कुटुंबांना जवळजवळ चार टन साखरेचे वाटप करणार आहे. तसेच आपल्या ग्रामपंचायत मधील 1000 आदिवासी कुटुंबांना ते दीवाळीचा फराळ वाटप करणार आहेत हा उपक्रम ते सलग चार दिवस राबवणार असून दिवाळीनिमित्त सरपंच प्रकाश गाजरे आदर्शवत उपक्रम राबवत आहेत.
दरम्यान हा कार्यक्रम म्हसोबा झाप ग्रामपंचायत मध्ये दि. ३ पासून सलग चार दिवस हा उपक्रम ते आपल्या ग्रामपंचायत मध्ये राबविणार आहेत. दिवाळी निमित्त फराळ वाटप हा तालुक्यातील सर्वात मोठा उपक्रम असून पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे आमदार निलेश लंके यांच्या सामाजिक कामाची त्यांनी प्रेरणा घेतली असून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून सरपंच प्रकाश गाजरे हे तालुक्यात उत्तम असं काम करत आहेत.
आज पर्यंत सामाजिक काम करत असताना सरपंच प्रकाश गाजरे यांनी आमदार निलेश लंके प्रतिष्ठान व संघर्ष ग्रुप च्या माध्यमातून म्हसोबाझाप ग्रामपंचायत तसेच परिसरामध्ये अनेक विविध सामाजिक उपक्रम राबवले आहे. त्या माध्यमातून त्यांनी एक उत्तम असे काम परिसरामध्ये उभे केले आहे.
दिवाळीनिमित्त आपल्या म्हसोबा झाप ग्रामपंचायत मध्ये फराळ वाटप करून ते आदर्श असा उपक्रम आता राबवत आहेत.
COMMENTS