निघोज येथे सैनिकांचा सेवापूर्ती सोहळा ग्रामस्थांच्या वतीने सैनिकांचा सत्कार होणे प्रेरणादायी : कॅप्टन विठ्ठल वराळ निघोज ग्रामस्थ, ग्रामपंच...
निघोज येथे सैनिकांचा सेवापूर्ती सोहळा
ग्रामस्थांच्या वतीने सैनिकांचा सत्कार होणे प्रेरणादायी : कॅप्टन विठ्ठल वराळ
निघोज ग्रामस्थ, ग्रामपंचायत आयोजित सैनिक सेवा पुर्ती कार्यक्रमात मेजर विकास आनंदा वराळ व मेजर गोरक्ष उत्तम भांबरे यांचा सत्कार करण्यात आला.
पारनेर/प्रतिनिधी :
सैनिकांची सेवापुर्ती झाल्यानंतर त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार होणे ही सैनिकांसाठी प्रेरणादायी व अभिमानास्पद बाब असल्याचे प्रतिपादन कॅप्टन विठ्ठलराव वराळ यांनी व्यक्त केले आहे.निघोज येथील मेजर विकास आनंदा वराळ व मेजर गोरक्ष उत्तम भांबरे यांची १७ वर्षाची सेवा मिलीट्रीमध्ये पुर्ण झाल्याबद्दल सेवापुर्ती सत्कार कार्यक्रमाचे निघोज ग्रामस्थ,निघोज ग्रामपंचात व आजी माजी सैनिक सेवा संस्था यांच्यावतीने आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कॅप्टन वराळ बोलत होते.कॅप्टन अंकुश कर्डीले हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.तत्पुर्वी निघोज बसस्थानक ते मळगंगा मंदीर , संदीप पाटील चौक, ग्रामपंचायत परिसर अशी मेजर वराळ व मेजर भांबरे यांची वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली.यावेळी देशभक्ती गितावर नाच करीत युवकांनी भारत मातेच्या जयजयकाराच्या घोषना देत , रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या ग्रामस्थांनी मिरवणुकीवर फुलांचा वर्षाव केला.जागोजागी उभ्या असलेल्या महिलांनी मेजर वराळ व मेजर भांबरे यांचे औंशन केले.सैनिक सेवापुर्ती व मिरवणूक पाहण्यासाठी दुतर्फा गर्दी झाली होती.
यावेळी सरपंच चित्राताई वराळ पाटील, शिरापूरचे सरपंच गुंडाभाउ उर्फ हनुमंत भोसले, राळेगण थेरपाळचे सरपंच पंकज कारखिले, निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय औटी, सहाय्यक फौजदार अशोकराव निकम, संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ, उपसरपंच ज्ञानेश्वर उर्फ माउलीशेठ वरखडे, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्त शिवाजीराव वराळ, आजी माजी सैनिक सेवा भावी संस्थेचे पदाधिकारी मेजर अमोल ठुबे, मेजर ज्ञानेश्वर शेटे, मेजर विजय वराळ, मेजर सत्यवान लंके, सुभेदार मेजर रघुनाथ लंके, मेजर गोरक्ष रसाळ, मेजर जालिंदर वराळ, मेजर सुनिल वराळ, मेजर गोपाळ वराळ, मेजर शंकर वराळ, मेजर दगडू डेरे, युवानेते किरण ठुबे, रामा तराळ, उद्योजक नामदेवशेठ घोलप, मंगेश लाळगे, भिमराव लामखडे, निलेश घोडे, विलासराव हारदे,
अस्लमभाई इनामदार, जय भुकन, यशवंत लंके, संपत शिंदे, भाजपचे शिरूर शहराध्यक्ष संभाजी रणदिवे, फक्कड शेळके,लहू जाधव, आप्पा वराळ,रामा वराळ, पैलवान अमोल लंके, पैलवान सुभाष वराळ, राहुल वराळ, विलास वराळ, मारुती घोरपडे, मच्छिंद्र पिंपरकर, विवेक पिंपरकर, किरण पिंपरकर, प्रशांत शेळके आदी तसेच संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन, संदीप पाटील युवामंचचे सदस्य व ग्रामस्थ तसेच मेजर वराळ व मेजर भांबरे यांचे आई वडील, नातेवाईक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.कॅप्टन वराळ यांनी मेजर वराळ व मेजर भाांबरे यांच्या सैनिक सेवेचे कौतुक केले.गावापासून शेकडो किलोमीटर दूर असताना त्यांनी देशसेवा करताना त्यांना समाजसेवेचा विसर न पडता गाव व परिसरातील सामाजिक सेवेला प्राधान्य देणयाचे काम त्यांच्या कुटुंबीयांनी केले आहे. कॅप्टन अंकुश कर्डीले यांनी सैनिक प्रक्षिक्षण व सेवाकाळ याची माहिती देत मेजर वराळ व मेजर भांबरे यांचे कौतुक केले.संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांनी यापुढील काळात सेवापुर्ती पुर्ण झालेल्या सैनिकांचा ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांच्या वतीने जाहिर सत्कार करण्याची परंपरा सुरू करणार असल्याची ग्वाही दिली.मेजर वराळ व मेजर भांबरे यांनी सत्काराला उत्तर देताना १७ वर्षाच्या सेवेची माहिती दिली.
आई वडील यांची सेवा करीत गाव व परिसरात सामाजिक सेवाभाव करण्याचा मनोदय यावेळी त्यांनी व्यक्त केला. यावेळी मेजर वराळ व मेजर भांबरे यांचा तसेच त्यांच्या आई व वडील यांचा विविध सहकारी संंस्था तसेच निघोज ग्रामपंचात ,आजी माजी सैनिक सेवाभावी संस्था, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट, निघोज व्यापारी असोसिएशन, अल्पसंख्याक समाज मंडळ, पैलवान प्रतिष्ठान पारनेर तालुका, संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन, संदीप पाटील वराळ युवामंच, शिरूर शहर ग्रामस्थ,कान्हुरपठार व टाकळी ढोकेश्ववर ,टाकळी हाजी ग्रामस्थ आदी बहुसंख्य व्यक्तींच्या वतीने सत्कार करण्यात आला.
मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्त शिवाजीराव वराळ यांनी यावेळी देशरक्षणासाठी गेलेल्या प्रत्तेक सैनिकाचा सेवापुर्ती कार्यक्रम घेउन ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांनी सत्कार करुण सन्मानित केले पाहिजे ही सुचना या वेळी मांडली या सूचनेचे टाळ्या वाजवून स्वागत उपस्थीतांनी केले.ग्रामपंचायत वतीने ग्रामपंचायत सदस्य सैनिकांचा सेवापूर्ती कार्यक्रम घेउन सन्मानित करण्यात येणार असल्याची ग्वाही दिली.
COMMENTS