निघोज उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन शनिवारी उद्घाटन; आ. लंके, जि. प. माजी सभापती उचाळे उपस्थितीत पारनेर/प्रतिनिधी : माजी उपसभापती नान...
निघोज उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
शनिवारी उद्घाटन; आ. लंके, जि. प. माजी सभापती उचाळे उपस्थितीत
पारनेर/प्रतिनिधी :
माजी उपसभापती नानासाहेब वरखडे व माजी सरपंच व बाजार समितीचे माजी उपसभापती संदीप पाटील वराळ यांच्या प्रेरणेने माऊली वरखडे मित्र परिवार आयोजित निघोज येथे शनिवार (दि. २७) पासून या स्पर्धे ला सुरूवात होणार आहे. मंगळवार (दि.३०) पर्यंत उपसरपंच चषक भव्य नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती निघोजचे उपसरपंच ज्ञानेश्वर उर्फ माऊली वरखडे यांनी दिली आहे.
आमदार निलेश लंके यांच्या हस्ते शनिवारी (दि. २७) क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी जिल्हा
परिषदेचे माजी सभापती मधुकर उचाळे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेत. प्रथम क्रमांकाचे बक्षीस ११ हजार १११ रुपये असून ग्रामपंचायतचे माजी सदस्य भास्करराव वराळ यांच्या वतीने ते देण्यात आले आहे. द्वितीय क्रमांकाचे बक्षीस ८८८८ रुपये तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मंगेश लाळगे व उज्वला ग्रो फर्टीलायझर दूकानचे मालक सचिन वरखडे यांच्या वतीने देण्यात येणार आहे.
तृतीय क्रमांकाचे बक्षीस ६६६६ रुपये शिरुर येथील उद्योजक विकास दंडवते व वडनेर उपसरपंच पृथ्वीराज खुपटे यांच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस ४४४४ रुपये राळेगण थेरपाळचे सरपंच पंकज कारखिले यांच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ, टाकळी हाजी गावचे सरपंच दामु घोडे, राळेगण थेरपाळचे सरपंच पंकज कारखिले, ग्रामपंचायत सदस्य भास्करराव वराळ यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास पारनेर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी व नेते उपस्थित होते.
ही क्रिकेट स्पर्धा वडनेर रोडवरील वरखडे वस्ती मैदानावर आयोजित केल्या असून क्रिकेट संघ व प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
COMMENTS