भूमिपुत्र शेतकरी संघटनेचा रस्ता रोको स्थगित महावितरण सोबत झालेल्या चर्चेत शेतकऱ्यांना दिलासा सक्तीने वीज वसुली सुरू ठेवल्यास आक्रमक होऊ : स...
भूमिपुत्र शेतकरी संघटनेचा रस्ता रोको स्थगित
महावितरण सोबत झालेल्या चर्चेत शेतकऱ्यांना दिलासा
सक्तीने वीज वसुली सुरू ठेवल्यास आक्रमक होऊ : संतोष वाडेकर
पारनेर प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यात महावितरण कडून सक्तीची वीज वसुली सुरू होती याविरोधात भूमिपुत्र शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेत टाकळी ढोकेश्वर येथे मंगळवार दि.२३ रोजी शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्ता रोको आंदोलन पुकारले होते. विज प्रश्नावर शेतकऱ्यांसाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे दि. २२ रोजी महावितरण प्रशासन व पोलिस प्रशासन अधिकाऱ्यांसमवेत भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भातील वीज प्रश्नावरील अनेक महत्त्वाचे मुद्दे प्रशासना समोर ठेवले यावेळी वाडेकर यांनी प्रशासनासोबत चर्चा करत असताना महावितरण प्रशासन शेतकऱ्यांकडून सध्या सक्तीने वीज वसुली करत असून ती थांबवावी अशी मागणी यावेळी केली अन्यथा भुमिपुत्र शेतकरी संघटना आक्रमक होईल.
प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत यावेळी बोलताना भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर यांनी जर शेतकऱ्यांची पारनेर तालुक्यात सक्तीने वीज वसुली सुरु ठेवल्यास प्रशासनासोबत चर्चा न करता आम्ही आक्रमक भूमिका घेऊ असे अधिकार्यांसमोर यावेळी सांगितले. यावेळी महावितरणचे विभागीय अधिकारी ठाकूर साहेब, महावितरणचे पारनेर चे कार्यकारी अभियंता आडभाई साहेब पारनेर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप गोपनीय विभागाचे दिवटे साहेब तसेच भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर जिल्हा उपाध्यक्ष सिताराम देठे, राजू करंदीकर, पारनेर प्रवक्ते राजू रोकडे, अविनाश देशमुख प्रवीण आंधळे, अनिकेत आंधळे, व भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
दरम्यान प्रशासनासोबत चर्चा झाल्यानंतर प्रशासकीय स्तरावर आंदोलन मागे घेण्यासाठी वीज प्रश्नावर तोडगा काढण्यात आला यावेळी महावितरण कडून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आला असून वीज वसुली शेतकऱ्यांकडून टप्प्याटप्प्याने केली जाईल कोणत्याही प्रकारचा दबाव न टाकता शेतकऱ्यांसोबत सामंजस्य ठेवून यापुढेही पूर्ण दाबाने शेतकऱ्यांना वीज पुरवठा करणार असल्याचे महावितरण प्रशासनाकडून भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले