राळेगण थेरपाळ ऊस पेटवल्याने मोठे नुकसान अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल पारनेर/प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाळ येथील अज्ञात ...
राळेगण थेरपाळ ऊस पेटवल्याने मोठे नुकसान
अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाळ येथील अज्ञात व्यक्तीने उस पेटवल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या संदर्भात पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात व्यक्तीचा तातडीने शोध घेऊन दोषीवर काठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राळेगण थेरपाळचे ग्रामस्थ तसेच पारनेर तालुका पत्रकार संघाने केली आहे.
राळेगण थेरपाळ परिसरातील माजमपूर शिवारात गट नंबर १६० मध्ये पत्रकार जयदीप शामराव कारखीले, विमल शामराव कारखीले, सागर शामराव कारखीले यांच्या मालकीची शेती असून या मध्ये ऊस पीक असून अज्ञात व्यक्तीने ऊस पेटवून दिला. यावेळी राजू आढाव, वैभव पाचंगे व प्रदीप कारखीले हे माजमपूर येथून कांदा गोण्या भरून पीक अप घेऊन येत असताना त्यांच्या निदर्शनास आले. तेथे उपस्थित असलेले दामोदर कारखीले, रामदास कारखीले, विलास कारखीले, आकाश वाढवणे, अभिजित गायकर, अजित गायकर, गणेश कारखीले, अंकुश वाढवणे मदतीसाठी धाऊन आले.
COMMENTS