निघोज परिसरात वराळ, बाबर यांनी मोठ्या प्रमाणात विकासकामे मार्गी लावली सरपंच पंकज कारखिले यांची माहिती; राळेगण थेरपाळ येथील विकासकामांचे उद्घ...
निघोज परिसरात वराळ, बाबर यांनी मोठ्या प्रमाणात विकासकामे मार्गी लावली
सरपंच पंकज कारखिले यांची माहिती; राळेगण थेरपाळ येथील विकासकामांचे उद्घाटन
जिल्हा परिषद माध्यमातून राळेगण थेरपाळ येथील विकासकामांचे उद्घाटन संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी पंचायत समिती सदस्य दिनेश बाबर, राळेगण थेरपाळचे लोकनियुक्त सरपंच पंकजदादा कारखिले व ग्रामस्थ तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पारनेर प्रतिनिधी :
जिल्हा परिषद पंचायत समिती माध्यमातून जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई संदीप वराळ पाटील व पंचायत समितीचे सदस्य दिनेश बाबर यांनी मोठ्या प्रमाणात विकासकामे मार्गी लावली असल्याची माहिती राळेगण थेरपाळचे लोकनियुक्त सरपंच पंकजदादा कारखिले यांनी दिली आहे.
जिल्हा परिषद सदस्या श्रीमती.पुष्पाताई संदिप पाटील वराळ यांच्या प्रयत्नातून पूर्ण झालेल्या मौजे.राळेगण थेरपाळ येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील प्रसूतीगृह बांधकाम करणे
या कामाचा लोकार्पण समारंभ संदिप पाटील वराळ जनसेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष सचिनभाऊ वराळ पाटील यांच्या शुभहस्ते पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्य दिनेश बाबर हे होते. तसेच यावेळीउपसरपंच अनिताताई मोरे,चेअरमन अंकुशराव कारखिले, मा.चेअरमन भरतनाना शितोळे,तंटामुक्ती अध्यक्ष शशिभाऊ कारखिले,मा.उपसरपंच योगेश आढाव,ग्रामपंचायत सदस्य नरेशदादा सोनवणे,निलेश शितोळे,निघोज गावचे तंटामुक्ती अध्यक्ष मंगेशदादा लाळगे,सोसायटी संचालक पांडुरंग बेंडाले,तसेच साहेबराव गाडीलकर,सुयश कारखिले,आकाश मोरे,सुनिल सोनवणे,अस्लमभाई इनामदार,निलेश घोडे,
बाळा कार्ले,अक्षय इचके,महेश कारखिले,हरिभाऊ कारखिले,नकुल गाडीलकर,हनुमंत आढाव,किसन कारखिले,ठेकेदार इंजि. अमीर शेख,डॉ.प्रशांत चव्हाण,डॉ.पाचांगरे,ढवळे मॅडम,रोहिणी सोनवणे, रिहाना शेख,आरती सोनवणे, कांचन अवचार, उज्वला सोनवणे आदींसह राळेगण थेरपाळ ग्रामस्थ उपस्थित होते. सरपंच कारखिले यावेळी म्हणाले खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद गटात गेली पाच वर्षात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत.अशाचप्रकारे माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील व खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कामे सुरू राहणार असल्याची ग्वाही सरपंच कारखिले यांनी दिली आहे.