मोफत ७/१२ वरील दुरुस्ती वाचन आणि पोटखराबा दुरुस्ती व्हावी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ज्यांच्याकडे मागणी पारनेर किसान काँग्रेसच्या वतीने वि...
मोफत ७/१२ वरील दुरुस्ती वाचन आणि पोटखराबा दुरुस्ती व्हावी
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ज्यांच्याकडे मागणी
पारनेर किसान काँग्रेसच्या वतीने विठ्ठल देठे यांचे निवेदन
पारनेर प्रतिनिधी :
पारनेर /किसान कॉंग्रेसचे विठ्ठलराव देठे पाटील समवेत अनेक कार्यकर्तांनी महाराष्ट राज्यचे महसुल मंत्री मा .नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांची भेट घेतली. पारनेर तालुक्यातील शेतकरी वर्गाच्या तहसील कार्यालया संबधी असणाऱ्या समस्या मांडल्या
त्यात प्रामुख्याने महाविकास आघाडी सरकारने मोफत ७ / १२ उतारा वरील दुरुस्ती व वाचनाच्या आणि पोटखराबा दुरुस्ती व्हावी या उदिष्टाने ऑनलाईन देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.
या उपक्रमाची अमलबजावणीसाठी पारनेर तहसील कडून खुपच विलंब होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणींचा दूरावस्था वाढत चालली आहे.
त्याला कुठेतरी लवकरात लवकर आळा बसावा व शेतकऱ्यांना या उपाय योजनेचा लाभ तातडीने मिळावा या भूमिकेतून चार्चा करून तसे विनंती पूर्वक लेखी निवेदन मा. नामदार साहेबांना दिले.
यावेळी जिल्हा कॉंग्रेसचे सन्वयक श्री ज्ञानदेव वाफारे साहेब, संभाजी रोहकले, बाजिराव गागरे, सितारामदेठे, संपत जाधव, अक्षय गायकवाड, रामकृष्ण पवार, मंगेश गरूड, सागर लंके, शिवाजी खोडदे, उत्तम पठारे, सौ सुनंदाताई गोरडे ( महिला आघाडी अध्यक्ष ),वृशाली बांडे, विकास खोडदे, जयदीप मुळे इत्यादी मान्यवर व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते .