'गोरेश्वर' च्या सारोळा कासार शाखेचा रविवारी वर्धापनदिन चेअरमन बाजीराव पानमंद यांची माहिती पारनेर प्रतिनिधी : गोरेश्वर ग्रामीण मल्टि...
'गोरेश्वर' च्या सारोळा कासार शाखेचा रविवारी वर्धापनदिन
चेअरमन बाजीराव पानमंद यांची माहिती
पारनेर प्रतिनिधी :
गोरेश्वर ग्रामीण मल्टिस्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी., गोरेगाव सारोळा कासार शाखेचा प्रथम वर्धापनदिन सोहळा रविवार दि. २८ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. नगर तालुक्यातील सारोळा कासार या ठिकाणी हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती गोरेश्वर ग्रामीण मल्टिस्टेटचे संस्थापक चेअरमन बाजीराव पानमंद यांनी दिली. गोरेश्वर ग्रामीण मल्टिस्टेटने अल्पावधीतच १ कोटी ५० लाख ठेवींचा टप्पा पार केला आहे.
तसेच तत्पर सुविधा देवून नावलौकिक वाढविला आहे. गोरेश्वर ग्रामीण मल्टिस्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिड सोसायटी रविवार दि. २८ नोव्हेंबर रोजी द्वितीय वर्षात पदार्पण करत असून या निमित्ताने सत्यनारायण महापूजा व सेवा निवृत्तांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला असल्याचे चेअरमन पानमंद यांनी सांगितले.
COMMENTS