---- निघोज प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी आरोग्य सेवेत हलगर्जीपणा करीत असून त्यांच्यावर कडक कारवाई करा दुष्काळ निवार...
----
निघोज प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी आरोग्य सेवेत हलगर्जीपणा करीत असून त्यांच्यावर कडक कारवाई करा
दुष्काळ निवारण समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ बाळासाहेब लंके यांची आरोग्यमंत्री डॉ राजेश टोपे यांच्याकडे मागणी
लंके हे लोकनेते आमदार निलेशजी लंके साहेब यांचे कट्टर समर्थक
पारनेर प्रतिनिधी :
निघोज प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी रुण्गांना सेवा न देता आरोग्य सेवेमध्ये हलगर्जीपणा करीत असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी दुष्काळ निवारण समितीचे अध्यक्ष व लोकनेते आमदार निलेशजी लंके साहेब यांचे कट्टर समर्थक ज्ञानेश्वर उर्फ बाळासाहेब लंके यांनी आरोग्यमंत्री डॉ राजेश टोपे, आमदार निलेश लंके तसेच जिल्हाधिकारी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे. गेली आठ दिवसांपूर्वी एका व्यक्तीला सर्पदंश झाला.मात्र या ठिकाणी फक्त एक आरोग्यसेविका उपलब्ध होती.वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी गैरहजर होते.
अशा वेळी सर्वसामान्य लोकांनी करायचे काय हा प्रश्न उपस्थित होत आहे.संबधीत व्यक्तीच्या नातेवाईकांनी मला संपर्क केला.मी लगेच आमदार निलेश लंके यांच्याशी संपर्क साधला.तातडीने त्या व्यक्तीला नगर येथे उपचारासाठी नेण्यात आले.म्हणून त्या व्यक्तीचे प्राण वाचले.यदाकदचीत दुर्देवाने नगर येथे तातडीने उपचार मिळाले नसते तर ती व्यक्ती मृत झाली असती.एका गरीबाचा संसार उघड्यावर पडला असता.म्हणून या घटनेची तातडीने चौकशी करुन हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी लंके यांनी केली आहे. अशाप्रकारे एका गरीब कुटुंबातील गर्भवती महिला निघोजच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आली होती.
मात्र उपचार न करता या ठिकाणी असणाऱ्या आरोग्य सेविका असोत की वैद्यकीय अधिकारी किंवा ईतर कर्मचारी संबंधित रुग्णांवर उपचार न करता फक्त वेळ मारुण नेतात.उपचार न झाल्यास संबंधित महिलांना खाजगी दवाखान्यात जाण्याशिवाय पर्याय नसतो.खाजगी दवाखान्यात जाणे म्हणजे शस्त्रक्रिया करून बाळंतपण करणे हे नित्याचेच झाले आहे.अशाप्रकारे गोरगरीब लोकाना पन्नास ते साठ हजार रुपयांचा फटका बसतो.अशाप्रकारे या आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा खाजगी दवाखान्याशी मिलीभगत आहे की काय असा संशय येतो.उपचाराबाबत हलगर्जीपणा हे नित्याचेच झाले आहे.रुग्ण आरोग्य केंद्रात गेले की सर्वसामान्य जनतेला पुढाऱ्यांना फोन करण्याशिवाय गत्यंतर राहात नाही.
असा प्रकार सातत्याने होत असतो. गोरगरीबांना या आरोग्य केंद्रात तातडीने विनाविलंब उपचार मिळाले पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे.यासाठी संबंधित विभागाच्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे.यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री डॉ राजेश टोपे , आमदार निलेश लंके साहेब यांच्याकडे तसेच जिल्हाधिकारी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिले असून लवकरात लवकर चौकशी करून कारवाई होईल अशी अपेक्षा लंके यांनी व्यक्त केली आहे.
या ठिकाणी बऱ्याच वर्षांपासून काही आरोग्य सेविका व कर्मचारी आहेत.गावच्या जनतेची उपचार न करता बोळवण कशी करायची याचा अनुभव त्यांना दांडगा आहे.म्हणूनच ईतर आरोग्य सेविका व कर्मचारी त्यांचीच री ओढतात.अशाप्रकारे गोरगरीब गरजू जनतेला वेळेवर उपचार मिळत नाही.याची दखल जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी घेउन बराच वर्षं शासकीय सेवेचा पाहुणचार घेणाऱ्यांची बदली केल्यास या प्राथमिक आरोग्य केंद्रातील ईतर कर्मचाऱ्यांना शिस्त लागेल अशी मागणी दुष्काळ निवारण समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ बाळासाहेब लंके यांनी केली आहे.
COMMENTS