खोट्या तक्रारदार, साक्षीदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीसही न्यायालयाच्या आदेशाची दखल घेत नसल्याचा आरोप पारनेर प्रतिनिधी : अॅट्रॉसि...
खोट्या तक्रारदार, साक्षीदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
पोलीसही न्यायालयाच्या आदेशाची दखल घेत नसल्याचा आरोप
पारनेर प्रतिनिधी :
अॅट्रॉसिटी व विनयभंगाच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता झालेल्या व्यक्तीने खोटी तक्रार दाखल करणाऱ्या तक्रारदार व साक्षीदारांवर न्यायालयाच्या आदेशानुसार "गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. परंतु पोलिसांनीही अद्याप कारवाई न केल्याने याबाबत पोलीस अधिक्षकांसह वरिष्ठ अधिकारी व गृहमंत्र्यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी पारनेर तालुक्यातील जवळे येथील रामदास घावटे यांनी निवेदन दिले आहे.
घावटे यांच्या विरोधात दाखल झालेल्या अॅट्रॉसिटी व विनयभंगा गुन्ह्यातून अहमदनगर येथील सत्र न्यायालयाने निर्दोष करून खोटी फिर्याद व साक्ष देणाऱ्या पाच जनांवर कारवाईचे आदेश पोलीस उपअधीक्षक अ नगर ग्रामीण अजित पाटील यांना दिले होते. परंतु पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केली नाही यानंतर घावटे यांनी याबाबत. वरिष्ठ पोलीस अधिकारी व न्यायालयात याबाबत तक्रार नोंदविली होती विशेष सत्र न्यायालय यांनी या खटल्यातील फिर्यादी व साक्षीदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी कारण असले खोटे गुन्हे दाखल करून यांच्यासारखे फिर्यादी व साक्षीदार स्वतः चा हेतू साध्य करण्यासाठी न्यायालयीन यंत्रणेचा गैरवापर करतानां आढळले आहेत. भविष्यात कायद्याची भीती राहील व असले प्रकार थांबतील, असा स्पष्ट अभिप्राय निकाल पत्रात नोंदवला होता.
परंतु १० महिने होऊनही कारवाई झाली नाही म्हणून रामदास घावटे यांनी गृहमंत्रालय पोलीस महासंचालक महानिरीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल केली असून कारवाई न झाल्यास महिनाभरानंतर आंदोलनाचा इशारा दिला आहे.
COMMENTS