योगेश शिंदे बनले काँग्रेसचा पारनेर तालुक्यात युवा चेहरा संघटनात्मक कामाच्या माध्यमातून देत आहेत काँग्रेसला नवसंजीवनी योगेश शिंदे यांची टाकळी...
योगेश शिंदे बनले काँग्रेसचा पारनेर तालुक्यात युवा चेहरा
संघटनात्मक कामाच्या माध्यमातून देत आहेत काँग्रेसला नवसंजीवनी
योगेश शिंदे यांची टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटात निर्माण झाली सौम्य लाट
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस पक्षाची भूमिका ठरणार निर्णायक
काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून संघटनात्मक पातळीवर पारनेर तालुका युवक काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष योगेश शिंदे हे काम करत असून काँग्रेस पक्षाच्या पारनेर तालुक्यातील संघटन वाढीसाठी ते प्रयत्न करत आहेत. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटात त्यांनी पक्षाचा झेंडा फडकविण्याचा निश्चय केला असून येणारा जिल्हा परिषद पंचायत समिती बाजार समिती निवडणुका काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीनिशी लढवणार असल्याचे योगेश शिंदे यांनी सांगितले. युवक काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सुरु केलेले काम आज पारनेर तालुक्यात त्यांनी उभे केले आहे. अनेक कष्टकरी, शेतकरी व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर ते काम करत असून युवक संघटना बळकट करण्यासाठी ते गावोगावी काँग्रेसची विचारधारा पोहोचवत आहेत.
काँग्रेस पक्षाला जुने दिवस पुन्हा आणण्यासाठी योगेश शिंदे हे पूर्ण ताकतीनिशी संघटन उभे करत असून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सुधीर तांबे व प्रदेश अध्यक्ष युवक सत्यजीत तांबे यांच्या माध्यमातून व मार्गदर्शनाखाली ते काम करत आहेत. पारनेर तालुक्यात काँग्रेस पक्षाला बळकट करण्यासाठी त्यांचा प्रामाणिक प्रयत्न असून त्यांनी निर्माण केलेल्या संघटनेमुळे येणार्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा नक्कीच तालुक्यात वरचष्मा असेल महत्वपूर्ण लढतीतुन ही निवडणूक काँग्रेस पक्ष लढवणार असल्याचे पारनेर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष योगेश शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटात पारनेर तालुका युवक काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष यांनी उभ्या केलेल्या संघटनेमुळे त्यांची या गटामध्ये सौम्य लाट असून त्यांनी निवडणूक पूर्ण ताकदीने लढविल्यास काँग्रेसचा विजय याठिकाणी निश्चित मानला जात आहे. त्यामुळे काँग्रेसला तालुक्यात पुन्हा पूर्वीचे दिवस प्राप्त होतील. सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी खऱ्या अर्थाने योगेश शिंदे हे काम करत असल्यामुळे व काँग्रेसच्या विचारधारेला ताकद देण्यासाठी मंत्री बाळासाहेब थोरात यांना आदर्श मानून योगेश शिंदे हे पारनेर तालुक्यात युवक काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाला ताकद देत आहेत.
दरम्यान योगेश शिंदे यांनी आज पर्यंत समाजात काम करत असताना अनेक विद्यार्थी शेतकरी कष्टकरी दीन दलित गरीब समाजासाठी सामाजिक कार्य केलेले आहे. समाजसेवेची आवड असलेलं हे युवा नेतृत्व आज काँग्रेस पक्षाची पारनेर तालुक्यातील चेहरा बनले आहे. योगेश शिंदे यांच्या रूपाने पारनेर तालुक्यात आता काँग्रेस पक्षाला एक नवीन धडाडीचा युवा चेहरा मिळाला असल्याने काँग्रेसला आता पुन्हा एकदा तालुक्यात निश्चितच पूर्वीचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही असे जाणकार सांगतात.
योगेश शिंदे ही सामाजिक नेतृत्व असून समाजसेवेची आवड असल्यामुळे सर्वसामान्य जनता त्यांच्यासोबत असल्याचे दिसते. युवक काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून काम करत असताना टाकळीढोकेश्वर जिल्हा परिषद गटांमध्ये त्यांनी युवकांची एक मोठी फळी उभी केली असून त्या माध्यमातून ते सामाजिक कार्य तसेच राजकीय ताकद काँग्रेस पक्षांमध्ये निर्माण करू पाहात आहेत.
टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटाला विकासाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी आता हा शेतकरी पुत्र मैदानात उतरला असून प्रस्थापित घराणेशाहीला शह देण्यासाठी योगेश शिंदे यांनी टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटांमध्ये कंबर कसली आहे. त्या माध्यमातून आता टाकळी ढोकेश्वर गटांमध्ये ते निश्चितच प्रस्थापितांना समोर आव्हान निर्माण करू पाहत आहेत.
टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटामध्ये योगेश शिंदे यांची आता सौम्य लाट निर्माण झाली असून येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाची पारनेर तालुक्यात निर्णायक भूमिका असणार आहे.
जाणकारांच्या मते योगेश शिंदे यांच्या रूपाने काँग्रेस पक्षाला आता पुन्हा एकदा तालुक्यात पूर्वीचे दिवस पाहायला मिळतील यात आता तिळमात्र शंका नाही.