सुजित झावरे पाटील यांचे काम आदर्शवत : डॉ. विकासानंद महाराज मिसाळ ----- शहाजापूर येथे ग्राम सचिवालयाचे उद्घाटन ------ सुजित झावरे यांच्या माध...
सुजित झावरे पाटील यांचे काम आदर्शवत : डॉ. विकासानंद महाराज मिसाळ
-----
शहाजापूर येथे ग्राम सचिवालयाचे उद्घाटन
------
सुजित झावरे यांच्या माध्यमातून तालुक्यात अनेक विकासकामे मार्गी
पारनेर प्रतिनिधी :
सुजीत झावरे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जनसुविधा योजनेअंतर्गत पारनेर तालुक्यातील महत्वपूर्ण ग्रामपंचायत शहाजापूर येथे ग्रामसचिवालयाचे उद्घाटन ह. भ. प. डॉ. विकासानंद महाराज मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील होते.
या कार्यक्रम प्रसंगी बोलताना डॉ. ह. भ. प. विकासानंद महाराज मिसाळ म्हणाले की सुजीत झावरे पाटील यांच्याकडे कोणती ही सत्ता नसताना त्यांनी तालुक्यात केलेले विकास कामे पारनेर तालुक्याला विकासाच्या दिशेने नेणारी आहेत धावरे यांचे काम आदर्श असून सुजीत झावरे पाटील हे निरपेक्ष भावनेने काम करणारे माझे शिष्य आहेत त्यांनी यापुढे समाजासाठी काम करत असताना समाजाच्या विकासाची व हिताची कामे करावीत असे मत व्यक्त केले.
शहाजापूर येथे सुजित झावरे पाटील यांच्या माध्यमातून ग्रामसचिवालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी सुजीत झावरे पाटील यांचे यावेळी आभार मानले व सन्मान केला.
दरम्यान या कार्यक्रम प्रसंगी अहमदनगर जिल्हा परिषद नियोजन समितीचे सदस्य राहुल शिंदे पाटील सुपा गावचे सरपंच योगेश रोकङे, उपसरपंच सागर मैड, सुरेश पठारे , शंकर महांङुळे, कङुस भाऊसाहेब, शहाजापुरचे सरपंच प्रमोद गवळी, उपसरपंच मच्छिंद्र जरे, मा.सरपंच आण्णा मोटे, साहेबराव म्हस्के, जगण सकट, रतन बेंद्रे, शशिकांत गवळी, शिवाजी मोटे, संजय जरे, अनिल मोटे , अदिनाथ जरे व परिसरातील ग्रामस्थ व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.