अहमदनगर(प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झालेले भारतीय संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांना श्रध्...
अहमदनगर(प्रतिनिधी)-
हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झालेले भारतीय संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. भिंगारच्या भगवान गौतमबुध्द जॉगिंग पार्कमध्ये घेण्यात आलेल्या श्रध्दांजली कार्यक्रमात जनरल रावत अमर रहे!... च्या घोषणा देत त्यांच्या शूरवीरतेला सलामी देण्यात आली.
या श्रध्दांजली कार्यक्रमासाठी हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, रमेश वराडे, दिपक बडदे, मेजर दिलीप ठोकळ, सुभाष गोंधळे, बाबासाहेब बेरड, रमेश कडूस, श्रीरंग देवकुळे, सुधाकर चिदंबर, दिपक घोडके, अशोक पराते, विकास भिंगारदिवे, मनोहर पाडळे, विलास दळवी, संतोष लुणिया, रमेश कोठारी, सुहास देवराईकर, दिनेश शहापूरकर, मुकेश क्षीरसागर, संदीप सोनवणे, सुर्यकांत कटोरे, राजू कांबळे, किरण फुलारी, सुरेश कानडे, अब्बासभाई शेख, धनंजय नामदे, नंदलाल परदेशी, केशव दवणे, राजेंद्र येळीकर, नागेश खुरपे, राहुल मोहिरे, विठ्ठल राहिंज, महेश सरोदे, बापूसाहेब तांबे, सत्यजित कस्तुरे, सिध्देश्वर भंडारे, गोकुळ भांगे आदी उपस्थित होते.
संजय सपकाळ म्हणाले की, देशाचा शूर सेनानी अपघातात गेल्याचे दु:ख होत आहे. त्यांनी राष्ट्र निष्ठेने देशाची सेवा केली. भारतीय सेना सक्षम व अद्यावत करण्यासाठी त्यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या निधनाने देशाचे मोठे नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
COMMENTS