संयमी, शांत, सुसंस्कृत नेतृत्व रामदास भोसले निघोज गटात आणली विकासाची गंगा सामाजिक दृष्टिकोन ठेवून शिवसेनेसाठी कार्य शिवसेनेचे विचार व कार्य...
संयमी, शांत, सुसंस्कृत नेतृत्व रामदास भोसले
निघोज गटात आणली विकासाची गंगा
सामाजिक दृष्टिकोन ठेवून शिवसेनेसाठी कार्य
शिवसेनेचे विचार व कार्य सर्वसामान्य जनते पर्यंत पोचविण्यासाठी करत आहेत प्रयत्न
भोसले साहेब एक कृषी तज्ञ सामाजिक राजकारणी
✍️ गणेश जगदाळे/पारनेर
पारनेर तालुक्यात नेहमी सामाजिक बांधिलकी जपत विकासासाठी धडपडणारे शांत, संयमी, सुसंस्कृत नेतृत्व म्हणजे उद्योजक रामदास भोसले साहेब तालुक्यातील दरोडी सारख्या अति दुर्गम डोंगराळ ग्रामीण भागातून आपल्या जीवनाची खर्या अर्थाने सुरुवात करणाऱ्या रामदास भोसले यांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले. माध्यमिक शिक्षणासाठी ते पायपीट करत आळकुटी येथे जात त्यांनी आपले दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पुढे उच्च शिक्षणासाठी त्यांनी मुंबई गाठली व आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण झाल्यानंतर नोकरीच्या शोधात त्यांनी पुणे, मुंबई येथे छोट्या-मोठ्या कंपनीमध्ये नोकरी केली. परंतु रामदास भोसले साहेबां जवळ व्यावसायिक दृष्टिकोन असल्याने त्यांनी नोकरीला राजीनामा देत पुणे या ठिकाणी आपला स्वतःचा व्यवसाय सुरु केला. त्या माध्यमातून त्यांनी बांधकाम क्षेत्रातही काम केले. त्यानंतर त्यांचा सुरू झालेला प्रवास आजही यशस्वी सुरू आहे. रामदास भोसले साहेबांना खऱ्या अर्थाने सामाजिक कामाची आवड त्यामुळे समाजाशी असलेली त्यांची बांधिलकी त्यांनी नेहमी जपण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान व्यवसाया मध्ये प्रगती करत असताना रामदास भोसले साहेबांना अनेकांचे विशेष मार्गदर्शन लाभले. राजकिय सामाजिक कामाची आवड असल्यामुळे आपल्या दरोडी या मूळ गावाशी त्यांची असलेली नाळ ही घट्ट होती. त्यामुळे गावासाठी व परिसरासाठी आपण काहीतरी केले पाहिजे ही उर्मी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. ग्रामविकासासाठी काम करायचे हे भोसले साहेबांनी मनाशी पक्कं ठरवलं व गावात सामाजिक कामांचा डोंगर उभा केला. गावात वाडी वस्तीवर रस्ते, वीज, पाणी पोहोचविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. व गावात ग्रामविकासाची चळवळ त्यांनी निर्माण केली. दरोडी सारख्या अतिदुर्गम असलेल्या गावात त्यांनी स्वखर्चाने माध्यमिक शाळा सुरू करून सर्वसामान्य गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे दार उघडे करून दिले.
सामाजिक बांधिलकी जपत काम करत राहणे ही खऱ्या अर्थाने पारनेर तालुक्यात रामदास भोसले साहेबांची ओळख आहे. शिवसेनेची ८० % टक्के समाजकारण व २०% टक्के राजकारण ही विचारधारा घेऊन हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना आपले आदर्श मानून काम करत असलेले रामदास भोसले साहेबांनी पारनेर तालुक्यात स्वतःचे एक राजकीय वलय तयार केले आहे. राजकीय सुसंस्कृत भूमिका असलेले रामदास भोसले साहेब हे नेहमी तालुक्यात विकासाचे सामाजिक राजकारण करताना दिसतात.
रामदास भोसले यांना कृषी क्षेत्राची प्रचंड आवड असून कृषी क्षेत्रातही नेहमी विविध प्रयोग करत असतात. सेनापती बापट पतसंस्थेचे सध्या चेअरमन असलेल्या रामदास भोसले साहेबांनी पतसंस्था चळवळीच्या माध्यमातून सहकार क्षेत्रामध्ये ही उल्लेखनीय असं कार्य केले आहे. व सहकार क्षेत्राला जिवंत ठेवण्यासाठी ते काम करत आहेत.
पारनेर तालुक्यात शिवसेनेच्या माध्यमातून काम करत असताना विधानसभेचे माजी उपाध्यक्ष मा. आमदार विजयराव औटी साहेब यांचे रामदास भोसले साहेबांना वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. २०१२ साली तत्कालीन आमदार पारनेरचे विकासपुरुष विजयराव औटी यांच्या नेतृत्वाखाली निघोज जिल्हा परिषद गटाचे नेतृत्व करण्याची संधी रामदास भोसले साहेबांना मिळाली. त्यांच्या वहिनी मंदाताई भोसले या निघोज जिल्हा परिषद गटाच्या अहमदनगर जिल्हा परिषदेच्या सदस्य झाल्या. व त्यानंतर राजकारणात भोसले साहेबांनी मागे वळून पाहिलेच नाही आपल्या गावच्या आणि परिसराच्या विकासासाठी त्यांनी झोकून दिले व जिल्हा परिषद गटाचा कायापालट करण्यासाठी व शासकीय योजना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागाला मिळण्यासाठी त्यांनी जो प्रयत्न केला.
त्या माध्यमातून आमदार विजयराव औटी यांच्या नेतृत्वाखाली रामदास भोसले यांनी निघोज जिल्हा परिषद गट विकासाच्या वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला. निघोज, देवीभोयरे, वडझिरे, आळकुटी, जांबुत चोंभुत, शिरापूर, लोणीमावळा, बाभूळवाडे, दरोडी, रांधे, गारखिंडी या गावांमध्ये विकासाच्या अनेक योजना रामदास भोसले यांनी राबविल्या प्रत्येक गावात ग्रामपंचायत कार्यालय, पाणी पुरवठा योजना, स्थानिक रस्ते तसेच शिव पानंद रस्ते, शासकीय ग्रामीण रुग्णालय, आणि पाणी अडवून बंधाऱ्यांची निर्मिती केली. अशा अनेक विकासाच्या दिशेने घेऊन जाणाऱ्या शासकीय योजना ग्रामस्तरावर राबवून निघोज जिल्हा परिषद गटाचा चेहरामोहरा बदलण्याचे काम माजी आमदार विजय औटी यांच्या माध्यमातून रामदास भोसले साहेबांनी केले.
शिवसेनेचे नगर दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे सर यांच्या माध्यमातून शिवसेनेच्या संघटनात्मक पातळीवर काम करण्यासाठी अहमदनगर जिल्हा उपप्रमुख म्हणून रामदास भोसले साहेबांना खऱ्या अर्थानं संधी मिळाली आणि त्यानंतर त्यांचे राजकीय कारकीर्द आणखीनच बहरली शिवसेनेसारख्या आक्रमक पक्षामध्ये काम करत असताना शिवसेना प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या सारखे संयमाने काम करणारे पारनेर तालुक्यातील सुसंस्कृत नेतृत्व म्हणून रामदास भोसले साहेबांची अहमदनगर जिल्ह्यात ओळख आहे.
शिवसेना पक्षा मध्ये अहमदनगर जिल्ह्यात संघटनात्मक पातळीवर काम करत असताना शिवसेनेचे पारनेर चे माजी आमदार विजयराव औटी अहमदनगर जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली शिवसेना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी रामदास भोसले यांनी प्रयत्न केले व संघटनात्मक पातळीवर शिवसेनेची वाढ अहमदनगर जिल्ह्यात करण्यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केलेला दिसतो.
दरम्यान रामदास भोसले एक संयमी शिस्तप्रिय आणि सुसंस्कृत नेतृत्व म्हणून पुढे आले असून पारनेर तालुक्यात त्यांच्याकडे एक भविष्याचे आशादायी नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे.
आपल्या राजकीय जीवनात रामदास भोसले साहेबांनी अनेक चढ-उतार पाहिले विजय पराजयातून आपल्या यशाची सीडी ते आजही यशस्वीपणे चढत आहेत राजकारणात व समाजकारणात त्यांना तालुक्यात भविष्यात चांगले यश मिळेल आणि ते एक सुसंस्कृत राजकीय सामाजिक दिशा तालुक्याला नक्कीच देतील अशी आपण अपेक्षा करूया त्यांना वाढदिवसानिमित्त खुप सार्या शुभेच्छा ...
संयमी, शांत, सुसंस्कृत नेतृत्व ...
रामदास भोसले साहेब हे एक संयमी सुसंस्कृत नेतृत्व असून पारनेर तालुक्यात त्यांनी उभे केलेले काम हे कौतुकास पात्र आहे. ते तालुक्यात सुसंस्कृत राजकारणाचा वारसा चालवत असून सामाजिक दृष्टिकोन ठेवून काम करत आहे हे त्यांच्या राजकारणाची खरी जमेची बाजू आहे. माजी आमदार विजय औटी यांच्या माध्यमातून त्यांनी तालुक्यात शिवसेनेचे मोठे काम उभे केले आहे.
शिवसेनेत संघटनात्मक पातळीवर मोठे काम रामदास भोसले साहेबांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना आदर्श मानून उद्धव ठाकरे साहेब व मा आमदार विजयराव औटी साहेब तसेच नगर दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे सर यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शना खाली अहमदनगर जिल्ह्यात उपजिल्हाप्रमुख या पदावर शिवसेनेच्या माध्यमातून काम करत असताना संघटनात्मक पातळीवर शिवसेनेची एक आक्रमक सुसंस्कृत फळी त्यांनी तयार केली आहे. व त्या माध्यमातून शिवसेनेचे काम ते वाढवत आहेत.
तालुक्यात आणली विकासाची गंगा
रामदास भोसले साहेबांनी आमदार विजयराव औटी यांच्या नेतृत्वात काम करत असताना सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक शासकीय योजना ग्रामस्तरावर राबवल्या. त्या माध्यमातून त्यांनी तालुक्यात विकासाची गंगा आणली आहे. त्यामुळे तालुक्यात अनेक विकासाची कामे मार्गी लागली.
भोसले साहेब एक कृषी तज्ञ...
कृषी क्षेत्राची रामदास भोसले साहेबांना लहानपणापासूनच आवड त्यामुळे शेतीमध्ये विविध प्रयोग करणे व ते यशस्वी करून नियोजन बद्ध शेती कशा पद्धतीने करता येईल याचे उत्तम उदाहरण म्हणजेच भोसले साहेब त्यांच्याकडे आधुनिक प्रगतिशील शेतकरी म्हणून पाहिले जात आहे. तालुक्यातील करंडी सारख्या ठिकाणी माळरानावर पंधरा एकर मध्ये त्यांनी सुंदर असं नंदनवन फुलवले आहे.
COMMENTS