स्व. बाळासाहेब विखे पाटील यांचे सहकार चळवळीत दिशादर्शक काम सचिन पाटील वराळ यांचे प्रतिपादन निघोजमध्ये स्व. बाळासाहेब विखे पाटील जयंती साजरी ...
स्व. बाळासाहेब विखे पाटील यांचे सहकार चळवळीत दिशादर्शक काम
सचिन पाटील वराळ यांचे प्रतिपादन
निघोजमध्ये स्व. बाळासाहेब विखे पाटील जयंती साजरी
पारनेर/प्रतिनिधी :
माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांनी राज्यात शैक्षणिक व सहकार चळवळीच्या माध्यमातून दिशादर्शक काम केल्याने राज्याचा मोठ्या प्रमाणात विकास झाला असल्याचे प्रतिपादन संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांनी व्यक्त केले आहे.
माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांची जयंती निघोत येथे संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी विखे पाटील यांच्या प्रतिमेचे वराळ पाटील यांच्या हस्ते पुजन करुन पुष्पहार घालण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुंबई येथील व्यवसायिक भागा लाळगे, अल्पसंख्याक समाजाचे नेते अस्लमभाई इनामदार, संदीप पाटील युवामंच पदाधिकारी निलेश घोडे, शशिकांत वराळ, बबन बाळाजी कवाद, मच्छिंद्र दुतारे, संदीप पाटील वराळ जनसंपर्क कार्यालयाचे व्यवस्थापक श्रीकांत पवार, राजेश आवारी, नविन गायकवाड, खासदार डॉ. सुजय विखे पाटील युवा मंचचे प्रवक्ते प्रतीक वरखडे उपस्थित होते.
पुढे बोलतांना वराळ पाटील म्हणाले, सहकार व शैक्षणिक चळवळीच्या माध्यमातून राज्यातील सर्व सामान्य जनतेचा खन्या अर्थाने विकास झाला आहे. विखे पाटील यांनी सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी फार मोठे योगदान दिले असल्याचे त्यांनी सांगितले. प्रतिक वरखडे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व आभार निलेश घोडे यांनी मानले.