जनजागृती द्वारेच एड्सवर नियंत्रण शक्य : डॉ. खिलारी जागतिक एड्स दिनानिमित्त सावलीची रॅली टाकळी ढोकेश्वर : जनजागृती द्वारेच एड्सवर नियंत्रण...
जनजागृती द्वारेच एड्सवर नियंत्रण शक्य : डॉ. खिलारी
जागतिक एड्स दिनानिमित्त सावलीची रॅली
टाकळी ढोकेश्वर :
जनजागृती द्वारेच एड्सवर नियंत्रण आणणे शक्य आहे असे प्रतिपादन सावली प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. भाऊसाहेब खिलारी यांनी केले.जागतिक एड्स दिनानिमित्त सावली प्रतिष्ठान संचलित सावली स्कूल ऑफ नर्सिंग व सावली प्रतिष्ठानच्या लॅब कॉलेजच्या विद्यार्थिनींनी सामाजिक जनजागृती फेरीचे आयोजन केले होते.यावेळी पुढे बोलताना डॉ.भाऊसाहेब खिलारी म्हणाले की,आजही एड्स आजाराविषयी लोकांमध्ये अनेक चुकीचे गैरसमज आहेत.
हा रोग संसर्गजन्य नाही त्यामुळे आजाराने ग्रस्त लोकांबरोबर जेवणे, खेळणे,राहणे,त्यांचे कपडे वापरणे यामुळे रोगाची लागण होत नाही. काळजी घेणे हाच एड्स वरती खरा उपचार आहे. हा आजार प्रामुख्याने एच आय व्ही बाधित व्यक्तीच्या लैगिंक संपर्कातुन तसेच बाधित रक्तातून पसरला जातो. यासाठी आपण स्वतः जागृत होणे गरजेचे आहे.संयम व लैंगिक सुरक्षितता ठेवून एड्सचा प्रसार निश्चितपणे रोखता येईल.
रॅलीद्वारे एड्स आजाराविषयी माहीतीपत्रकांचे नागरिकांना वाटप करण्यात आले.विद्यार्थिनींनी पोस्टर व एड्स आजाराविषयी घोषणा देत लक्ष वेधले.या रॅलीमध्ये ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. अजित शेंडे, प्राचार्य सुशांत शिंदे,दत्तप्रसाद सोनावळे, डॉ. सुधीर जासूद, रवींद्र बांडे, नितीन आंधळे, तसेच वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी उपस्थित होते. रॅली यशस्वीतेसाठी प्रा. रोहिणी नरवडे, प्रा. नामदेव वाळुंज , साई सावली हॉस्पिटल व खिलारी हॉस्पिटलचे कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.