टाकळी ढोकेश्वर मध्ये एसटीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी योग्य निर्णय घ्या : योगेश शिंदे प...
टाकळी ढोकेश्वर मध्ये एसटीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी योग्य निर्णय घ्या : योगेश शिंदे
पारनेर प्रतिनिधी :
टाकळी ढोकेश्वर याठिकाणी देसवडे, मांडवे, खडकवाडी, पळशी, पोखरी, म्हसोबाझाप, वडगाव सावताळ, वन कुटे या भागातून मोठ्या संख्येने सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी एस. टी. ने प्रवास करून टाकळी ढोकेश्वर तसेच पारनेर या ठिकाणी शिक्षणासाठी जात असतात
गेल्या एक महिन्यापासून एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचा आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी संप चालू आहे. त्यामुळे सर्व एसटी बसेस बंद आहेत. यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे सरकारने व एसटी कर्मचाऱ्यांनी दोन पावले पुढे मागे घेत संप मागे घ्यावा अशी भूमिका वडगाव सावताळचे माजी उपसरपंच योगेश शिंदे यांनी मांडली.
अगोदरच कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. आता कुठे थोड्या प्रमाणात शाळा चालू झाल्या असताना गेल्या एक महिन्यापासून एसटी बसेस बंद असल्याने मुलांना इच्छा असूनही शाळा कॉलेजमध्ये जाता येत नाही. एक वेळ मुले तरी मोटरसायकलवर डबल टिबल किंवा इतर वाहनांना लटकून जाताना दिसतात परंतु मुलींची मोठी अडचण होत आहे. अगोदरच मुलींची सुरक्षितता धोक्यात आहे. त्यात सुरक्षित प्रवासासाठी बस अनुकूल असताना गेल्या महिनाभरापासून त्याही बंद असल्याने मुलींना शाळेत जाण्यास खूप मोठी अडचण येत आहे. ज्या मुला-मुलींचे पालक मोलमजुरी करतात. ज्यांना मुलांना शाळेत सोडवणे अशक्य आहे. अशा मुलांचे शाळेत जाणे थांबले असल्याने त्यांचे कधीही न भरून येणारे शैक्षणिक नुकसान होत आहे.
कोरोनामुळे गेले दीड-दोन वर्षे शाळा बंद आहेत. या काळात मुलांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले. आता कोठे थोड्याफार प्रमाणात शाळा चालू झाले असताना व ज्ञानदानाचे काम चालू झाले असताना यात एसटी संपाचा मोठा अडथळा निर्माण झाला आहे. संपकरी आपल्या मागणीवर ठाम असल्याने एसटीचे चाके थांबले आहेत. यात शाळकरी मुले व त्यांचे पालक चांगल्या प्रकारे भरडले जात आहे. एसटी कर्मचारी व शासन यांच्या भांडणात विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. निदान निरागस शाळकरी विद्यार्थ्याकडे पाहून शासन व एसटी कर्मचाऱ्यांनी दोन पावले पुढे मागे येत संपाचा तिढा सुटावा व एसटी बस गाड्या पूर्ववत चालू करून विद्यार्थ्यांना करावी, अशी मागणी पालक वर्गातून केली जात आहे.
शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात लवकर योग्य तो निर्णय घ्यावा शासन स्तरावर निर्णय लवकर होणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करावी लागते एसटी बंद असल्यामुळे जाण्या-येण्यात अडचणी निर्माण होत असून विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे.
योगेश शिंदे (मा. उपसरपंच वडगाव सावताळ)