अध्यात्मात समाज घडवण्याची खरी ताकद डॉ. विकासानंद महाराज मिसाळ यांचे टाकळी ढोकेश्वर येथे प्रतिपादन टाकळी ढोकेश्वरला दत्त जयंती निमित्ताने कल...
अध्यात्मात समाज घडवण्याची खरी ताकद
डॉ. विकासानंद महाराज मिसाळ यांचे टाकळी ढोकेश्वर येथे प्रतिपादन
टाकळी ढोकेश्वरला दत्त जयंती निमित्ताने कलशारोहण सोहळा
पारनेर/प्रतिनिधी :
आजच्या स्पर्धेच्या व धावपळीच्या युगात अध्यात्माकडे ओढा वाढत चालला असून अध्यात्मामध्ये समाज घडविण्याची खरी ताकद आहे. असे प्रतिपादन ह.भ.प. डॉ. विकासानंद मिसाळ महाराज यांनी व्यक्त केले.
टाकळी ढोकेश्वरला दत्त जयंती निमित्ताने कलशारोहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी ह.भ.प. डॉ. विकासानंद बोलत होते. यावेळी ह.भ.प. एकनाथ महाराज उपस्थित होते. यावेळी जिल्हा मराठा शिक्षण संस्थेचे विश्वस्त सिताराम खिलारी, सरपंच अरुणा खिलारी, उपसरपंच सुनील चव्हाण, उद्योजक नारायण झावरे, काँग्रेस महिला तालुकाध्यक्षा सुनंदा गोरडे, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी खिलारी, आबासाहेब गायकवाड, रसिक कटारिया यांच्यासह ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. टाकळी ढोकेश्वर मध्ये जवळपास २५ ते २६ लाख रुपये खर्च करून श्री दत्त मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला असून यासाठी गंगाधर बांडे, बबन पायमोडे, रविंद्र पायमोडे, वसंत सैद शंकर रांधवण, बबन दिवेकर यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.
यावेळी हभप मिसाळ महाराज म्हणाले की, सोशल मीडियाचे जमानात जरी समाज एकिकडे चालला असला तरी दुसरीकडे अध्यात्माची आवड या विज्ञानयुगात निर्माण झाली. हे चित्र फार आशादायी असल्याचेही त्यांनी सांगितले.