हा खरा कान्हूर पठार करांचा विजय... कान्हूर पठार पतसंस्थेचे संचालक मंडळ जाहीर ही दिलीपराव ठुबे मामांना खऱ्या अर्थाने भावपूर्ण श्रद्धांजली : म...
हा खरा कान्हूर पठार करांचा विजय...
कान्हूर पठार पतसंस्थेचे संचालक मंडळ जाहीर
ही दिलीपराव ठुबे मामांना खऱ्या अर्थाने भावपूर्ण श्रद्धांजली : मनोज झावरे पाटील
पारनेर प्रतिनिधी :
कान्हूर पठार पतसंस्था ही महाराष्ट्रातील एक अग्रगण्य पतसंस्था असून या पतसंस्थेच्या ४०० कोटीच्या वर ठेवी आहेत. या संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली ही खऱ्या अर्थाने स्वर्गीय दिलीप राव ठुबे यांना भावपूर्ण श्रद्धांजली ठरली आहे.
स्व. दिलीपराव ठुबे यांच्या वर असलेल्या प्रेमामुळे व त्यांच्या सहकारातील असलेल्या उल्लेखनीय कामामुळे ही निवडणूक खऱ्या अर्थाने बिनविरोध करण्यात आली आहे.
कान्हूर पठार मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक मंडळ पुढील प्रमाणे...
महिला मतदार संघ
१) श्रीमती सुशीला दिलीपराव ठुबे
ठेविदार मतदार संघ
१) श्री. पोपटराव मानाजी झावरे
२)श्री. मंगेश बाळाजी गागरे
३)श्री.पाडुरंग किसन ठुबे
४) श्री. भास्कर रमाजी ठुबे
५)श्री. दादाभाऊ रामभाऊ नवले
कर्जदार मतदार संघ
१)श्री सुभाष सदाशिव नवले
२) श्री. गवराम सबाजी गाडगे
३)श्री. सुहास श्रीपत शेळके
४) श्री. संपत पाराजी खरमाळे
५)श्री. भगवान रभाजी वाळुंज
६) श्री. रामदास दादाभाऊ ठुबे
७) श्री. राजेंद्र सर्जेराव रोकडे
ओ. बी. सी मतदार संघ
१) श्री. राजेंद्र विठ्ठल व्यवहारे
अनुसुचित जाती जमाती मतदार संघ
१) श्री. मधुकर सावळेराम साळवी
या निवडणूक प्रक्रियेमध्ये निवडणूक अधिकारी श्री जोशी व श्री मोरे व सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून कान्हूर पठार पतसंस्थेचे कार्यकारी संचालक गोपा ठुबे, व सहाय्यक कार्यकारी संचालक नमिता ठुबे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले निवडणूक बिनविरोध करण्यामध्ये कान्हूर पठार पतसंस्थेचे सभासद पदाधिकारी व इतर मान्यवर तसेच स्वर्गीय दिलीपराव ठुबे प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांनी विशेष सहकार्य केले अशी माहिती कान्हूर पठार पतसंस्थेच्या नवनिर्वाचित संचालिका स्व. दिलीपराव ठुबे यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती सुशीला दिलीप ठुबे कान्हूर पठार पतसंस्थेचे सभासद सखाराम ठुबे नाना, पोपटराव झावरे, राजेंद्र रोकडे,संपत खरमाळे, दादाभाऊ नवले व कान्हूर पठार पतसंस्थेचे सभासद योगेश शिंदे डॉ. अमोल झावरे प्रवीण झावरे सर व कान्हूर पठार पतसंस्थेचे सभासद अँटिकरप्शनचे पारनेर तालुका अध्यक्ष मनोज झावरे यांनी ही माहिती दिली.
COMMENTS