जो मंच तुझा नाही तिथे उगाच सरपंच होऊ नको, जातील सोडून एक दिवस स्वार्थी काळजाचे तुला, असा प्रपंच आयुष्यात कधीच जोडू नको. नवी उमेद,नवी दिशा, व...
जो मंच तुझा नाही तिथे उगाच सरपंच होऊ नको,
जातील सोडून एक दिवस स्वार्थी काळजाचे तुला,
असा प्रपंच आयुष्यात कधीच जोडू नको.
नवी उमेद,नवी दिशा,
विश्र्वाचे सारे कोन तुझेच आहेत,
तु आख तुझ्या ओळखीचे अमर्याद असे अथांग पटांगण,
कोणापुढे मग कधीच लोटांगण घालु नको.
तु लढ स्व: कर्तृत्ववाची लढाई
जिद्दीची ढाल कायम सोबत ठेव,
होईल जयजयकार विजयाचा तुझ्या,
फक्त प्रामाणिकपणाची ती वाट कधीच सोडू नको..
खरंच ये मित्रा,
जो मंच तुझा नाही तिथे उगाच सरपंच होऊ नको,
जातील सोडून एक दिवस स्वार्थी काळजाचे तुला,
असा प्रपंच आयुष्यात कधीच जोडू नको
✍🏻 राजेश पवार