माजी आमदार विजयराव औटी माझे राजकीय गुरू : डॉ. श्रीकांत पठारे संधी मिळाल्यास जिल्हा परिषदेची निवडणूक लढणार शिवसेनेच्या माध्यमातून सहकाऱ्यांचे...
माजी आमदार विजयराव औटी माझे राजकीय गुरू : डॉ. श्रीकांत पठारे
संधी मिळाल्यास जिल्हा परिषदेची निवडणूक लढणार
शिवसेनेच्या माध्यमातून सहकाऱ्यांचे मोठे जाळे
माझ्या सामाजिक कामात शिवसेनेच्या वरिष्ठांची पाठीमागे मोठी ताकद
सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा परिषद निवडणूक लढणार
गणेश जगदाळे/पारनेर
शिवसेनेच्या माध्यमातून पारनेर तालुक्यात संघटनात्मक पातळीवर काम करणारे पारनेर पंचायत समितीचे आदर्श पंचायत समिती सदस्य डॉ. श्रीकांत पठारे हे राजकीय सामाजिक चांगलेच सक्रिय असून व वाढदिवसानिमित्त पूर्वसंध्यला पत्रकारांशी बोलताना त्यांनी पारनेर तालुक्याचे माजी आमदार विजयराव औटी यांना मी माझा आदर्श मानतो राजकारणात समाजकारणात काम करत असताना माजी आमदार विजयराव औटी यांच्या कडून मला खूप काही शिकायला मिळाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना अनेक विकासाची कामे मला माझ्या भागात करता आली. लोकांचे प्रश्न सोडवता आले हे मी माझे भाग्य समजतो. शिस्तप्रिय पारनेर तालुक्याची आदर्श नेतृत्व असलेले कार्यसम्राट माजी आमदार विजयराव औटी हे माझे राजकीय गुरू असून त्यांच्या सामाजिक राजकीय विचारांना आदर्श ठेवूनच मी काम करत आहे. विजयराव औटी साहेबांनी तालुक्यात काम करताना आमच्यासारख्या युवकांसमोर विकासाचा आदर्श निर्माण केला आहे.
माझे आदर्श व राजकीय गुरु माजी आमदार विजयराव औटी यांच्या माध्यमातून शिवसेनेमध्ये काम करत असताना आज आम्ही तालुक्यांमध्ये युवकांचे मोठे संघटन उभे करत असून सामाजिक कामांच्या माध्यमातून पारनेर तालुक्यात शिवसेना पक्ष बळकट करत आहे.
शिवसेना पक्षाने संधी दिल्यास भविष्यात मी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उतरून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.
आरोग्य सेवेच्या माध्यमातून काम करत असताना जे समाधान मिळते ते व्यक्त न करता येण्यासारखे आहे. असे पारनेर पंचायत समितीचे आदर्श सदस्य असलेले डॉ. श्रीकांत पठारे यांनी सांगितले.
संधी मिळाल्यास जिल्हा परिषद निवडणूक लढणार..
पारनेर पंचायत समितीचे आदर्श सदस्य डॉ. श्रीकांत पठारे म्हणाले की भविष्यात जर मला शिवसेना पक्षातून जिल्हा परिषद निवडणूक लढण्याची संधी मिळाल्यास सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी मी जिल्हा परिषद निवडणूक लढणार असून निवडून आल्यास सर्वसामान्य गरीब जनतेचे प्रश्न तळागाळात जाऊन सोडवणार आहे.