शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबध्द : बाळासाहेब सालके प्राथमिक शिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब सालके यांची निवड झाल्याने...
शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबध्द : बाळासाहेब सालके
प्राथमिक शिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब सालके यांची निवड झाल्याने शिक्षक सहकाऱ्यांकडून सत्कार व सन्मान
पारनेर प्रतिनिधी
शिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्राथमिक शिक्षकांच्या वतीने बाळासाहेब सालके यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलतांना बाळासाहेब रोहकले म्हणाले की बाळासाहेब हे सर्वांना बरोबर घेवून जाणारे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा. संजय सिनारे यांनी बाळासाहेबांन बरोबर केलेल्या कामाचा अनुभव सांगितला, त्यांनी अनेक प्रसंगांत साथ दिल्याची आठवण सांगितली. हिम्मतराव चेमटे यांनी बाळासाहेब यांच्याबरोबर असलेल्या मैत्री बद्दल सांगितले. म्हणाले बाळासाहेब धडाडीचे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या बरोबर काम करतांना आम्हाला आनंद होतो.
भाऊसाहेब गुंजाळ यांनी बाळासाहेब यांनी आमच्या प्रश्नासंदर्भात जिल्हा परिषद आणि मंत्रालयात केलेल्या पाठपुराव्याची आठवण सांगितली. मधूकर शिंदे यांनी बाळासाहेब यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू सांगितले. बरेच दिवस निरीक्षण करून बाळासाहेबांना बरोबर काम करण्याचा निर्णय घेतला. बाळासाहेब सर्वांना बरोबर घेऊन जाणारे अजातशत्रू व्यक्तिमत्व असल्याने त्यांच्या मागे मोठी ताकत उभी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विशाल खरमाळे यांनी आपली बाळासाहेबांन बरोबर असलेली मैत्री सर्वश्रुत आहे. बँकेविषयी असलेला अभ्यासू अध्यक्ष संघाला लाभल्याचे सांगितले. अधिकारी पदाधिकारी यांच्याकडून काम मार्गी लावण्याची बाळासाहेबांची हातोटी याविषयी सांगितले. विश्वस्त मच्छिंद्र कोल्हे यांनी जिल्हाभर असलेला बाळासाहेबांचा शिक्षकसंपर्क, कामाची पद्धत आपल्याला जवळून अनुभवता आली. बाळासाहेब संघाचे एकनिष्ठ पाईक असल्याचे सांगितले, त्यांना संघाने न्याय दिला असून योग्य व्यक्तीचा सन्मान केल्याचे सांगितले.
केंद्रप्रमुख तुकाराम ठाणगे यांनी बाळासाहेब यांनी आत्तापर्यंत केलेल्या कामाचा पाठपुरावा आपण पाहिला. एकला आहे त्यांची कामाची सचोटी याविषयी सांगितले भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.
शेवटी सत्काराला उत्तर देताना बाळासाहेब म्हणाले शिक्षक संघात आपण सुरवातीपासून काम करत असून भा. दा. पाटील यांच्यापासून सुरू झालेले संघ निष्ठेचा प्रवास सुरूच आहे. संघात काम करत असल्याचा आपल्याला अभिमान आहे .104 वर्षाची परंपरा असलेल्या संघातील धुरिणांनी अनेक प्रश्नांचा पाठपुरावा केला. संघामुळे शिक्षकांना आर्थिक स्थिरता आल्याचे सांगितले.
शिक्षणाच्या आणि शिक्षकांच्या प्रश्नचा पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. गेल्या 20 वर्षात केलेला पाठपुरावा सांगितला. आपल्या संघ निष्ठेला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली. आपण सर्व सामान्य शिक्षकांचे प्रतिनिधी असल्याने आपल्या सर्व जाणीव असल्याचे त्यांनी सांगितले. मी जरी जिल्हाध्यक्ष झालो असेल तर तुम्ही सर्वच जिल्हाध्यक्ष झाले असे समजा. राज्य नेते संभाजीराव थोरात तात्या आणि राज्य कार्यकारणी तसेच जिल्यातील सर्व प्रमुख नेते व संघप्रेमी शिक्षक बंधू भगिनीं मुळे आपल्याला या पदावर काम करण्याची संधी मिळाली असल्याचे सांगितले.
तुमच्या सर्व अडीअडचणीत मागे भक्कम उभे राहू असा विश्वास दिला. सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील नरसाळे तर आभार विजय दावभट यांनी मानले. यावेळी मुख्याध्यापक पांडुरंग पवार, रावसाहेब बर्वे,विलास. पवार, रानबा शिदे,कर्डिले सर, संजय रेपाळे, शिंदे सर, सीनारे सर, पोपट शिंदे सर,नितीन चेमटे सर , लहू थोरात सर, विकास खरमाळे सर, सुयोग पवार, अंबादास कोरडे सर,वैद्य सर,उषा बांडे मॅडम, चेमटे मॅडम बेबी कांडेकर मॅडम,थोरात मॅडम ,पारखे मॅडम, ठाणगे मॅडम,साठे मॅडम,निघुत मॅडम,पारखे मॅडम, रोहकले मॅडम यांच्यासह अनेक शिक्षक बंधू भगिनीं उपस्थित होते.