जातेगाव देवस्थानला वेगळ्या उंचीवर नेणार व नियोजनबद्ध विकास करणार आ. नीलेश लंके यांची ग्वाही पारनेर/प्रतिनिधी : तालुक्यासह राज्यातील लाखो...
जातेगाव देवस्थानला वेगळ्या उंचीवर नेणार व नियोजनबद्ध विकास करणार
आ. नीलेश लंके यांची ग्वाही
पारनेर/प्रतिनिधी : तालुक्यासह राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या जातेगांव येथील श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या नवनिर्वाचित विश्वस्तांनी आमदार नीलेश लंके यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी देवस्थानच्या विकासाबाबत आ. लंके यांच्याशी चर्चा केली.
यावेळी संवाद साधताना आ. लंके म्हणाले, विश्वस्त मंडळात माझ्या विचारांचे लोकांची नियुक्ती झाली याचे समाधान आहे. एक विचार असल्याने आता देवस्थानच्या विकासासाठी आपण जास्तीत काम जास्त करू शकतो. सामाजिक भान असलेले लोक विश्वस्त मंडळात आहेत. त्यांच्या हातून देवस्थानची चांगली सेवा घडो अशी प्रार्थना आ. लंके यांनी यावेळी श्री भैरवनाथांच्या चरणी केली.
आ. लंके पुढे म्हणाले, देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीनंतर सर्वांची एकत्रीत बैठक घेण्यात येईल. त्यात जास्तीत जास्त कामे कशी करता येतील याचे नियोजन केले जाईल. विकासाचा आराखडा तयार करण्यात येऊन या देवस्थानला वेगळया उंचीवर नेण्याचा आपला प्रयत्न राहिल अशी ग्वाही आ. लंके यांनी यावेळी दिली.
यावेळी विजयकुमार बन्सी जगताप, दत्तात्रय शिवाजी ढोरमले,शिवराम गेणबा पोटघन, रूपाली सचिन पोटघन, गणेश बाजीराव वाखारे, सचिन चंद्रकांत ढोरमले, निर्मला बाळू कळमकर, सोनाली सुजित ढोरमले, सुनिता विठ्ठल पोटघन, सविता विजय ढोरमले आदी उपस्थित होते.