बिनभिंतीच्या शाळेत सामाजिक बांधिलकीचा वस्तुपाठ ! दिशाच्या संस्थापिका निलम आंधळे यांनी जपली सामाजिक बांधिलकी.. बेघर मुला मुलींबरोबर साजरा के...
बिनभिंतीच्या शाळेत सामाजिक बांधिलकीचा वस्तुपाठ !
दिशाच्या संस्थापिका निलम आंधळे यांनी जपली सामाजिक बांधिलकी..
बेघर मुला मुलींबरोबर साजरा केला वाढदिवस
पारनेर/प्रतिनिधी :
वाढदिवस म्हटले की मित्र मैत्रिणी पार्टी आणि धमाल होय, किंवा आपल्या कुटुंबीयांसोबत पिकनिकला जावुन स्व आनंद घेणं असा एक प्रकारचा पायंडाच पडला आहे. परंतु त्याला छेद आणि फाटा देत दिशा महिला मंचच्या संस्थापिका निलम विकास आंधळे यांनी कळंबोली उड्डाणपुलाखाली भरणाऱ्या शाळेत जाऊन तेथील बिनभिंतीच्या शाळेमध्ये आपला जन्मदिवस साजरा करत खऱ्या अर्थाने एक वेगळा वस्तुपाठ ठेवला. प्रत्येक व्यक्ती समाजशील असल्याने त्यातून उतराई होण्याकरीता.
पुढे येण्याची गरज आहे. त्याच भावनेतून कामोठे येथील निलम आंधळे काम करतात. त्या सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे, सिंधुताई सपकाळ यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन त्या सामाजिक बांधिलकी जपत आहेत. त्यांनी दिशा महिला मंचची स्थापन केली. त्यामाध्यमातून महिला सक्षम आणि सबलीकरणाचे व्रत हाती घेतले. बचत गटाच्या माध्यमातून त्यांना आर्थिकदृष्टया सक्षम करण्याचा जणु विडाच उचलला आहे. त्यानुसार निलम आंधळे आणि त्यांच्या इतर हिरकणी मार्गक्रमण करीत आहेत. वर्षभर विविध उपक्रमाचे आयोजन करून महिलांना त्यामध्ये समावून घेतले जाते. त्यांना हक्कांचे व्यासपीठ आंधळे यांनी निर्माण करून दिले आहे. कोरोना काळातही त्यांनी व इतर सहकारी भगिनीनी काम केले.
पुरग्रस्तांना मदतीचा हात देवून खऱ्या अर्थाने मानुष्कीचे दर्शन घडवले. वेगळेपण, दिशा, प्रमाणिक व शुध्द सामाजिक हेतू या सर्व गोष्टी निलम आंधळे यांच्याशी एकरूप झाल्या आहेत. १७ डिसेंबर रोजी त्यांनी आपला वाढदिवस अत्यंत साध्या पध्दतीने साजरा केला. सर्व गोष्टींना फाटा देत त्यांनी कळंबोली पुलाखाली भरणाऱ्या बिन भितींच्या शाळेत जावून. तेथील वाढदिवसाचे एक प्रकारे सेलिब्रेशन केले. यामाध्यमातून या दिवसालात्याला सोशल इव्हेंटमध्ये परावर्तित केले. मुला मुलींसोबत केक कापून त्यांना खाऊचे वाटप केले. यानिमित्ताने बिनभितींच्या शाळेतील विदयार्थ्यांनी एक प्रकारे धम्माल केली. नृत्य तसेच गाणे गात सावित्रीच्या या लेकीला वाढदिवशी आनंद व समाधान एक प्रकारे भेट दिली.
COMMENTS