बैलगाडा शर्यत सुरू झाल्याचे पारनेर तालुका रिपब्लिकन पार्टी कडून स्वागत बैलगाडा शर्यत सुरू झाल्याचे समाधान : राजेंद्र उबाळे पारनेर/प्रतिनिधी ...
बैलगाडा शर्यत सुरू झाल्याचे पारनेर तालुका रिपब्लिकन पार्टी कडून स्वागत
बैलगाडा शर्यत सुरू झाल्याचे समाधान : राजेंद्र उबाळे
पारनेर/प्रतिनिधी :
बैलगाडा शर्यत सुरू होण्यासाठी सुप्रीम कोर्टाने आता सशर्त पाठिंबा दिला आहे. त्यामुळे बैलगाडा शर्यत आता सुरू झाली असून बैलगाडा शर्यती ला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून आणि बैलगाडा मालकांमधून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. बैलगाडा शर्यत सुरू झाल्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पारनेर यांच्या वतीनेही आनंद व्यक्त करण्यात आला यावेळी बोलताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पारनेर तालुका अध्यक्ष राजेंद्र उबाळे म्हणाले की शेतकऱ्याचे धन असलेला बैलगाडा शर्यत बऱ्याच दिवसापासून बंद होती केंद्र सरकार आता बंदी उठवली सुप्रीम कोर्ट बैलगाडा शर्यत सुरु करण्यास सशर्त परवानगी दिल्यामुळे शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त केला जात आहे आणि बैलगाडा मालकांसाठी हा सुवर्ण क्षण असून बैलगाडा शर्यत सुरू झाल्याचे समाधान आहे.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पारनेर तालुका उपाध्यक्ष किरण खूपटे, तालुका उपाध्यक्ष राजेश साठे, तालुका संघटक शरद सोनवणे यांनी बैलगाडा शर्यत सुरू झाल्यामुळे समाधान व्यक्त केले आहे.
COMMENTS