पारनेरमध्ये आजपासून कृषिगंगा प्रदर्शन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याहस्ते होणार उद्घाटन शेतकऱ्यांसाठी खास पर्वणी पारनेर/प्रतिनिधी : राष्ट्रव...
पारनेरमध्ये आजपासून कृषिगंगा प्रदर्शन
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याहस्ते होणार उद्घाटन
शेतकऱ्यांसाठी खास पर्वणी
पारनेर/प्रतिनिधी :
राष्ट्रवादी काँग्रेसची पारनेर शाखा व नीलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने २३ ते २६ डिसेंबरदरम्यान चार दिवशीय राज्यस्तरीय कृषिगंगा प्रदर्शनाचे आयोजन केले असल्याची माहिती आमदार नीलेश लंके यांनी दिली.
या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन ग्रामविकास तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होईल. या प्रदर्शनात दीडशे ते दोनशे कृषिविषयक दुकानांसह खाऊ गल्लीची दुकाने सहभागी होणार शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान आत्मसात व्हावे, माहिती व्हावी, यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन केले असल्याची माहिती कारभारी पोटघन, दादा शिंदे व शिवाजी शिंदे यांनी दिली. गतवर्षी कोरोनामुळे हे कृषी प्रदर्शन भरविणे शक्य नव्हते. परंतु या वर्षी पर्जन्यराजाने चांगली साथ दिल्याने व कोरोनाही आटोक्यात आल्यामुळे यावर्षी कृषी प्रदर्शन भरविणे हा मानस ठेवून आमदार लंके यांनी प्रदर्शन आयोजित केले आहे.
मागच्या प्रदर्शनात किमान १ लाख ७६ हजार शेतकरी बांधवांनी या कृषी प्रदर्शनाला भेट दिली होती. दोन कोटींवर आर्थिक उलाढाल या प्रदर्शनात झाली होती. यावर्षी पाऊस चांगला असल्याने शेतकरी बांधवांना या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून पर्वणी ठरणार आहे.
प्रदर्शनाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे स्वच्छ प्रांगण व प्रशस्त पार्किंगची सुविधा, तसेच चोख सुरक्षा व्यवस्था व कंपाउंड परिसर वॉटरप्रूफ कवर्ड प्रत्येक स्टॉलला आयोजकांमार्फत जनरल इन्शुरन्स प्रदर्शनाची सुविधा माध्यमाद्वारे प्रसिद्धी प्रत्येक स्टॉलमध्ये एक ट्यूबलाईट व नेम प्लेट जनरेटरची सोय दोन टेबल, दोन खुर्च्या पिण्याच्या पाण्याची सोय वाहन कंपन्यासाठी स्वतंत्र व्यवस्था भारतातील विविध नामांकित ब्रँड व संस्थांना प्रमुख सहभाग यात असेल.
प्रदर्शनाच्या माध्यमातून उत्पादकांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवत अल्प दरात आपली उत्पादने व सेवा लाखो ग्राहकापर्यंत पोहोचवता येतील. शेतकरी बांधवाना हो अगदी मोफत या प्रदर्शनाचा लाभ घेता येईल. या प्रदर्शनात डेअरी तंत्रज्ञान, कृषी तंत्रज्ञान सोलर शासकीय योजना शेती अवजारे, बी-बियाणे, कुक्कुटपालन, खते, सिंचन पतपुरवठा, हरितगृह व खाऊ गल्ली, लहानांसाठी खेळगल्ली यासह विविध कृषी पिकांसंदर्भात तज्ज्ञ मार्गदर्शक तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येईल. कृषी प्रदर्शन म्हणजे पारनेर, नगर तालुक्यांतील शेतकरी बांधवांना एक पर्वणी ठरणार आहे. शेती क्षेत्रातील सुधारित तंत्रज्ञान व माहिती या माध्यमातून सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविता येईल, हा मानस ठेवत सदर कृषिगंगा राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.
दीड टन वजनाचा रेडा प्रमुख आकर्षण
राष्ट्रवादी काँग्रेस आमदार नीलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने २३ ते २६ डिसेंबर दरम्यान चार दिवशीय राज्यस्तरीय कृषिगंगा प्रदर्शनाचे आयोजन केले असून या प्रदर्शनात टिकटॉक फेम दीड टन वजनाचा रेडा प्रमुख आकर्षण असणार आहे. गेल्या प्रदर्शनात भारत देशातील सर्वात बुटकी गाय या कृषी प्रदर्शनाचे आकर्षण होते. परंतु सोशल मीडियावर कोट्यवधी रुपयांची बोली असणारा दीड टन वजनाचा रेडा या कृषी प्रदर्शनात आकर्षणाचे प्रमुख केंद्र ठरणार आहे.
COMMENTS