अहमदनगर(प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीत बेकायदेशीरपणे नोकर भरती सुरु असल्याचा आरोप करत विरोधी संचालकांनी सोसायटीत ठिय्य...
अहमदनगर(प्रतिनिधी)-
अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीत बेकायदेशीरपणे नोकर भरती सुरु असल्याचा आरोप करत विरोधी संचालकांनी सोसायटीत ठिय्या आंदोलन केले. तर भविष्यात नोकर भरती करताना कोरोनाने मयत झालेल्या सभासदांच्या पाल्यांना नोकर भरतीत प्राधान्य देण्याची मागणी करण्यात आली. हा प्रश्न सोसायटीत सुरु असलेल्या भरतीच्या मुलाखत कक्षा बाहेर ठिय्या देऊन आंदोलकांनी नोकर भरती रद्द करण्याच्या जोरदार घोषणा दिल्या. या आंदोलनात विरोधी संचालक आप्पासाहेब शिंदे, बाबासाहेब बोडखे, महेंद्र हिंगे, वसंत खेडकर, माजी संचालक बाळासाहेब राजळे, सुभाष कडलग, विजय पठारे आदी सहभागी झाले होते.
माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या सत्ताधारी संचालक मंडळाने नोकर भरती करताना जिल्हा उपनिबंधक यांची परवानगी घेतलेली नसून, परस्पर नोकर भरतीप्रक्रिया सुरू ठेवली आहे. काही शाखांची सभासद संख्या कमी झाली असल्याने नोकर कपात होणे आवश्यक होते. तसेच संस्थेचे कामकाज ऑनलाइन झाले असल्याने मनुष्यबळ देखील कमी होणे अपेक्षित होते. संस्थेचे व सभासदांचे हीत न पाहता बहुमताने कोणतीही परीक्षा न घेता प्रत्यक्ष विशेष मुलाखतीद्वारे नोकर भरती चुकीच्या पध्दतीने केली जात आहे. बँकिंग, पतसंस्था क्षेत्रामध्ये कमीत कमी नोकर वर्गात आर्थिक व्यवहार करण्याचे धोरण असतानाही, सत्ताधारी संचालक मंडळाने स्वतःच्या आर्थिक हितासाठी मोठ्या प्रमाणावर नोकरभरती करण्याचा घाट घातला असल्याचा आरोप विरोधी संचालकांनी यावेळी केला. उमेदवार निश्चित असताना मुलाखतीचा फार्स कशासाठी?, त्रयस्त यंत्रणेकडून नोकर भरती प्रक्रिया का राबविली नाही?, जाहिरात देताना फक्त सभासदांच्या पाल्यांसाठी असा उल्लेख का केला नाही? नसल्याचे प्रश्न उपस्थित करुन सुरु असलेली बेकायदेशीर नोकरभरती रद्द करण्याची मागणी विरोधी संचालकांनी केली आहे.
COMMENTS