टाकळी ढोकेश्वर नवोदय विदयालयात कोरोना घुसलाच कसा ? शालेय व्यवस्थापन समिती व प्राचार्यांमध्ये समन्वयाचा अभाव ! दादा भालेकर/टाकळी ढोकेश्वर : क...
टाकळी ढोकेश्वर नवोदय विदयालयात कोरोना घुसलाच कसा ?
शालेय व्यवस्थापन समिती व प्राचार्यांमध्ये समन्वयाचा अभाव !
दादा भालेकर/टाकळी ढोकेश्वर :
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाअंतर्गत असणा-या अहमदनगर जिल्हयातील पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील एकमेव असणारे जवाहर नवोदय विदयालय कोरोनाच्या विळख्यात सापडले असून कोरोना बाधीत विदयार्थ्यांच्या संखेत दररोज वाढत होताना दिसून येत असताना या निवासी विदयालयात कोरोना घुसलाच कसा?याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत असल्याने याची चौकशी होण्याची गरज आहे. तालुक्यातील इतरही ठिकाणी असा प्रकार होऊ नये म्हणून प्रशासनाने वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.
सोमवार अखेर विदयालयातील कोरोना बाधीतांची संख्या ७० वर पोहोचली असून अजून ५० विदयार्थ्यांचे अहवाल प्रलंबीत असल्याने मंगळवार अखेर हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहेत.
तथापी करोडो रूपये अनुदान असणा-या या केंद्र सरकारच्या विदयालयात शालेय व्यवस्थापन समिती व प्राचार्य यांचा समन्वयाचा अभाव दिसत येत असून कोरोना काळात घ्यावयाची काळजी अभाव दिसत असून एका बाकावर एकच विदयार्थी,सँनिटायझर,नँपकीन,मास्क,स्वच्छता,मुतारी,स्नानगृह,बेसींग चा अभाव असल्यामुळे व कोरोनाने हातपाय पसरल्याचे प्राथमिक दर्शनी दिसत असताना याकडे घटनेनंतरही तब्बल तीन दिवसांनी नवोदय विदयालयाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डाँ.राजेंद्र भोसले यांनी लक्ष न दिल्यामुळे घडल्याची चर्चा पालक वर्गात आहेत.
तालुक्यात शाळा कॉलेज सुरू असून अनेक शाळा कॉलेजमध्ये प्रतिबंधक नियमावलीचे काटेकोरपणे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे बैठक व्यवस्था नियमावलीप्रमाणे होत नाही स्कूल बस मध्ये गर्दी होत आहे जर नवोदय सारखाच हलगर्जीपणा इतरही विद्यालय झाला तर कोरोनाचा मोठा उद्रेक होऊ शकतो.
निवासी विद्यालय असल्याने विद्यार्थी त्या ठिकाणी राहत आहेत विद्यार्थी बाहेर गेले नाही मग येथे कोरोना आला कुठून नेमकं कशामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली या गोष्टींची चौकशी होणे गरजेचे आहे.
विद्यालयात विद्यार्थ्यांची काळजी घेणे गरजेचे होते मात्र तसे झाले नसल्याने मोठ्या संख्येत कोरोना रुग्ण वाढले आहेत झालेला प्रकार हा गंभीर असून त्यामुळे कोरोना फैलाव होण्याची शक्यता आहे तालुक्यातील इतरही शाळा-कॉलेजमध्ये कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे काटेकोरपणे पालन केले जाते का याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
नवोदय विदयालयाचे अध्यक्ष जिल्हाधिका-यांनी दिली प्रथमच विदयालयास भेट...
एकीकडे संपुर्ण देशासह महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येत असताना नवोदय विदयालयाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डाँ.राजेंद्र भोसले यांनी हे निवासी विदयालय सुरू करण्यापुर्वी प्राचार्यांना जे आदेश देण्याची गरज होती त्याकडे लक्ष न दिल्यामुळे कोरोनाने हातपाय पसरल्याने नाहक विदयार्थी यात कोरोना बाधीत झाले असल्याची खंत पालकांमधून व्यक्त होत आहे.
ओमायक्राँनचा अहवाल चार पाच दिवसांत भेटणार...
नवोदय विदयालयातील कोरोना बाधीतांचा आकडा ७० वर पोहोचला असल्यामुळे प्रशासनाने ओमायक्राँन या कोरोनाच्या नव्या व्हेरीएंटच्या तपासणीसाठी विदयार्थी व कर्मचा-यांचे स्त्राव नमुने पुणे येथील लँबला पाठविण्यात आले असून येत्या चार ते पाच दिवसांत अहवाल प्राप्त होईल असे तालुका आरोग्य अधिकारी डाँ.प्रकाश लाळगे यांनी सांगितले.
COMMENTS