हिवरे कोरडा येथे आज प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे लोकार्पण सुजीत झावरे पाटील यांच्या उपस्थित लोकार्पण सोहळा पारनेर प्रतिनिधी : जिल्हा परिषदेच...
हिवरे कोरडा येथे आज प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे लोकार्पण
सुजीत झावरे पाटील यांच्या उपस्थित लोकार्पण सोहळा
पारनेर प्रतिनिधी :
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धावडे पाटील यांनी तालुक्यात स्वर्गीय आमदार वसंतराव झावरे पाटील यांच्या विकास प्रेरणेला आदर्श ठेवून अनेक विकासाची कामे केली सुजित झावरे यांनी तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांचे जाळे उभे केले असून खर्या अर्थाने त्यांनी या माध्यमातून पारनेर तालुक्यात आरोग्य सेतू बांधला आहे.
दरम्यान पारनेर तालुक्यातील ढवळपुरी जिल्हा परिषद गटातील महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या हिवरे कोरडा येथे सुजीत झावरे पाटील यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील ग्रामस्थांच्या आरोग्याच्या सोयीसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 75 लक्ष रुपये किंमतीची प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची इमारत मंजूर करण्यात आली होती या इमारतीचे काम पूर्ण झाले असून या आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे लोकार्पण जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार दि. 18 डिसेंबर 2021 रोजी सायंकाळी पाच वाजता करण्यात येणार आहे.
दरम्यान सुजीत झावरे पाटील यांनी हिवरे कोरडा येथे आरोग्य उपकेंद्र मंजूर करून त्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे हिवरे कोरडा पंचक्रोशीतील ग्रामस्थांना आता प्राथमिक उपचार घेण्यासाठी भाळवणी, गोरेगाव याठिकाणी जाण्याची गरज नाही.
प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या लोकार्पण सोहळ्यासाठी हिवरे कोरडा परिसरातील ग्रामस्थांनी कोरोना चे नियम पाळून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
COMMENTS