महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष पारनेर येथील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जेष्ठ समाजसेवक अणासाहेब हजारे यांच...
महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष
पारनेर येथील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जेष्ठ समाजसेवक अणासाहेब हजारे यांची घेतली भेट
टाकळी ढोकेश्वर/प्रतिनिधी :
राज्यभरातील महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यापीठीय संयुक्त कृती समितीच्या आदेशाने विविध मागण्यांसाठी महाविद्यालयात बेमुदत काम बंद आंदोलन दिनांक १८ पासून सुरू केले आहे. सदर आंदोलनाला दहा दिवस पूर्ण होऊन देखील शासनाने कुठलीही दखल घेतली नसल्याने पारनेर येथील न्यू आर्टस, कॉमर्स & सायन्स कॉलेजच्या महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जेष्ठ समाजसेवक अणासाहेब हजारे यांची भेट घेऊन त्यांच्या बरोबर आपल्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली.
आपल्या प्रमुख मागण्यांमध्ये सातव्या वेतन आयोगाच्या ५८ महिन्यांची थकबाकी देण्यात यावी, सेवाअंतर्गत आश्वासीत प्रगती योजनेचे रद्द केलेले शासन निर्णय पुन्हा लागु करावेत. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागु करावा,१० ते३० वर्षाच्या सेवेनंतर तीन लाभांची योजना पुर्वलक्षी प्रभावाने लागु करावी. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ६० वर्षे करावे तसेच नवीन नियुक्ती करण्यात याव्यात.२००५ नंतर सेवेत दाखल कर्मचारी यांना जुनी पेंशन योजना लागु करावी.
या सर्व मागण्यांचे निवेदन अहमदनगर जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष श्री बाळासाहेब इघे यांच्या हस्ते यावेळी अण्णांना देण्यात आले. यावेळी जिल्हा संघटनेचे सदस्य रुपेश शिदे. व राळेगण-सिद्धी चे माजी सरपंच विलास पोटे तसेच पारनेर तालुका शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री. बाबुराव शिंदे, उपाध्यक्ष गणेश साबळे, सचिव ठकाराम बुगे, सहसचिव सुभाष बर्डे, खाजिनदार_ श्रीमती. रोहीणी दिघे, कार्यालयीन अधिक्षक बाळासाहेब गिरी, श्रवण तांबे, नामदेव ठाणगे, सुरेंद्र भुजबळ, बाबुराव सुर्यवंशी, तुकाराम दातीर, अशोक व्हरकटे,जनार्दन बर्डे आदी उपस्थित होते.