मनीषा अडसूळ यांचे मेकअप क्षेत्रात उल्लेखनीय कार्य : अर्चना राऊत पारनेर/प्रतिनिधी : अर्चना राऊत मेकअप स्पर्धेतील देदीप्यमान यशाबद्दल मनीषा ...
मनीषा अडसूळ यांचे मेकअप क्षेत्रात उल्लेखनीय कार्य : अर्चना राऊत
पारनेर/प्रतिनिधी :
अर्चना राऊत मेकअप स्पर्धेतील देदीप्यमान यशाबद्दल मनीषा जयसिंग अडसूळ यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
आजकालच्या स्पर्धेच्या युगामध्ये चूल आणि मूल हि पारंपरिक संकल्पना बाजूला सावरून, संसाराचा गाडा चालवीत असताना कुटुंब आणि समाज याचा समतोल राखून ब्युटी आणि मेकअप क्षेत्रामध्ये आपली एक वेगळीच ओळख निर्माण करण्यात यशस्वी झालेल्या सपना ब्युटी आणि मेकअप अकॅडेमीच्या संचालिका मनीषा अडसूळ यांना औरंगाबाद येथे झालेल्या स्पर्धेमध्ये पारितोषिक आणि प्रमाणपत्र प्राप्त झाले. तसेच पुढील आधुनिक कोर्सेस करण्याची संधी प्राप्त झाली त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
यावेळी बोलताना मनीषा अडसूळ म्हणाल्या की जिद्द, चिकाटी आणि कष्ट या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास यशाचे दरवाजे नक्कीच खुले होतात. प्राप्त झालेल्या यशातून भारावून न जाता नगरमध्ये ब्युटी आणि मेकअप क्षेत्रामध्ये खूप नावीन्य आणण्याचा आपला मानस आहे. हे सर्व बोलत असताना अर्चना राऊत मॅडम चे आभार व्यक्त करण्यास मात्र त्या विसरल्या नाहीत. अर्चना राऊत मेकअप अकॅडमीच्या माध्यमातून नगर मध्ये मॅडमने वर्कशॉप आणि सेमिनार घ्यावे यासाठी त्या स्वतः आग्रही आहेत तशी विनंती सुद्धा त्यांनी मॅडमला केली. मॅडम बद्दल भावूक होऊन त्यांनी आभार व्यक्त करताना असे म्हटले कि
आली अनेक संकटे पण ती मात्र मागे हटली नाही..
अल्पावधीतच अवघा महाराष्ट्र मॅडम चे कर्तृत्व पाही ...
स्री शक्तीचा जागर आणि आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन ती काम करते काही
जिचा वारसा आहे ठायी ठायी
अशा आदर्श ब्युटी आणि मेकअप क्षेत्रातील अर्चनाताई ...
.
COMMENTS