वासुंदे येथे श्री स्वामी समर्थ बँकेच्या नूतन वर्ष दिनदर्शिकेचे प्रकाशन बँकेचे २०२२ रौप्यमहोत्सवी वर्ष बँक अहमदनगर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्...
वासुंदे येथे श्री स्वामी समर्थ बँकेच्या नूतन वर्ष दिनदर्शिकेचे प्रकाशन
बँकेचे २०२२ रौप्यमहोत्सवी वर्ष
बँक अहमदनगर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील अग्रगण्य
पारनेर/प्रतिनिधी :
अहमदनगर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील अग्रगण्य असणारी श्री. स्वामी समर्थ सहकारी बँकेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त वासुंदे येथे नूतन वर्ष दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. पारनेर तालुक्यातील निघोज या ठिकाणी १९९७ साली अॅड. अशोक शेळके यांच्या नेतृत्वाखाली बँकेची स्थापना झाली. आज अखेर बँकेच्या मुख्य कार्यालय सह एकूण ११ शाखा अहमदनगर पुणे जिल्ह्यात कार्यरत असून संपूर्ण राज्यात कार्यक्षेत्र आहे.
श्री. स्वामी समर्थ बँकेने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमांच्या चौकटीत राहून आर्थिकदृष्ट्या सक्षम व उत्कृष्ट व्यवस्थापनाचे सर्व निकष पूर्ण करताना आतापर्यंत निव्वळ एन. पी. ए. शून्य टक्के ठेवला आहे. बँकेने गेल्या २५ वर्षात सहकारात प्रगती करताना समाजातील विविध घटकांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी सहाय्य केले आहे. आज अखेर बँकेकडे १८० कोटी ठेवी असून एकूण गुंतवणूक १०३ कोटी आहे.
बँकेच्या वतीने ग्राहकांसाठी कोअर बँकिंग प्रणाली, आर. टी. जी. एस/एन ई एफ. टी, लाॅकर सुविधा, ठेवीस विमा संरक्षण, पंतप्रधान सुरक्षा विमा योजना, पंतप्रधान जीवनज्योती विमा योजना एस. एम. एस. सुविधा,मिस कॉल अलर्ट अशा अनेक सुविधा उपलब्ध केल्या आहेत. रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ग्राहकांसाठी आगामी काळात मोबाईल बँकिंग सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे बँकेचे चेअरमन अॅड.अशोक शेळके यांनी सांगितले. याप्रसंगी बँकेचे व्यवस्थापकीय मंडळ सदस्य इंजि. प्रसाद झावरे वासुंदे गावचे सरपंच भाऊशेठ सैद, उपसरपंच शंकर बर्वे, चेअरमन दिलीपराव पाटोळे, जोगेश्वरी पतसंस्थेचे चेअरमन जालिंदर वाबळे, मा.व्हा.चेअरमन बाळासाहेब झावरे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब शिंदे,
सगाजी दाते सर, पोपटराव हिंगडे, गजानन झावरे, भाऊ साळुंके, निवृत्ती बर्वे, सुंदरराव झावरे, संपत झावरे, मारुती उगले, ठका चेमटे, दादाभाऊ चेमटे, दशरथ हिंगडे, अर्जुन उगले, लक्ष्मण झावरे, भाऊसाहेब झावरे, दत्ता गांगड, बाळासाहेब साळुंके, भाऊसाहेब हिंगडे, बापूसाहेब गायके, शिवाजी वाबळे, सचिन साठे, भास्कर साळुंके, भाऊसाहेब जगदाळे, संतोष क्षिरसागर, साहेबराव हिंगडे, वसंत दाते, तबाजी टोपले, बाबाजी ठुबे, संतोष झावरे, अंकुश साळुंके, सुरेश शिंदे, दगडू हिंगडे, पंढरीनाथ गांगड, बाबाजी ठुबे, भिमा हिंगडे, सुनिल पानमंद ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.