नगर - महाराष्ट्रातील सध्याच्या आघाडी सरकारला सर्वत्र घोटाळ्यांच्या आरोपाने घेरले आहे. या महाविकास आघाडी सरकारमध्ये महा-घोटाळे, भ्रष्टाचार म...
नगर -
महाराष्ट्रातील सध्याच्या आघाडी सरकारला सर्वत्र घोटाळ्यांच्या आरोपाने घेरले आहे. या महाविकास आघाडी सरकारमध्ये महा-घोटाळे, भ्रष्टाचार माजला आहे. नगर जिल्ह्याचे महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या जिल्ह्यातच लाचार व बेजबाबदार अधिकारी व कर्मचारी करताहेत बोगस व नियमबाह्य फेरफार नोंदी ही गंभीर बाब असतांना देखील शासन दखल घेत नाही, ही शरमेची बाब आहे.
याबाबत नगर तालुका माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे अध्यक्ष सचिन एकनाथ एकाडे, उपाध्यक्ष शाम नामदेव कोके यांनी जिल्ह्याधिकारी कार्यालयाकडे एक निवेदन व माहिती अधिकारामध्ये उघडकिस आलेल्या फेरफार नोंदी. कोतवाल, तलाठी, मंडळ अधिकारी, कुळकायदा अव्वल कारकुर, तहसिलदार, यांनी संगनमताने केलेला बोगस कारभाराबाबत माहिती दिली. या सर्वांवर फौजदारी गुन्हा दाखल करुन निलंबनाची कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.
दोषींवर निलंबानाची व फौजदारी कार्यवाही करावी, नाही तर मा.विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक यांच्या दालनात अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचे तक्रारदार यांनी निवेदनात नमुद केले आहे.
COMMENTS