प्र. ग. खिलारी पाटील विद्यालयात आमदार निलेश लंकेच्या हास्ते भूमिपूजन व उद्घटने पारनेर प्रतिनिधी : रयत शिक्षण संस्थेच्या प्र.ग. खिलारी पाटी...
प्र. ग. खिलारी पाटील विद्यालयात आमदार निलेश लंकेच्या हास्ते भूमिपूजन व उद्घटने
पारनेर प्रतिनिधी :
रयत शिक्षण संस्थेच्या प्र.ग. खिलारी पाटील माध्यमिक विद्यालयात शुक्रवार दि. १० डिसेंबर रोजी तीन वर्ग खोल्यांचे भूमिपूजन व वसतिगृहाच्या भोजन कक्षाचे उद्घाटन आमदार निलेश लंके साहेबांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमांचे अध्यक्ष रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य मा. आ. दादाभाऊ कळमकर साहेब होते.
सदर कार्यक्रम प्रसंगी आमदार निलेश लंके यांनी विद्यालयाच्या समस्या जाणून घेवून विद्यालयाच्या प्रागणात प्रार्थना स्थळावर पेव्हर ब्लॉक बसवून देण्याचे जाहिर केले. तसेच विद्यालयाकडे येणारा रस्ता ग्रामपंचायत सरपंच अरुणा प्रदिप खिलारी यांनी कॉक्रीटीकरण करून देण्याचे जाहिर केले.
सदर कार्यक्रम प्रसंगी प्रा. सुनिल प्रभाकर खिलारी यांनी विद्यालयास ५१०००/ (अक्षरी एक्कावन्न हजार रुपये मात्र) राजेश भंडारी यांनी ५१०००/- (अक्षरी - एक्कावन्न हजार रुपये मात्र) त्याचप्रमाणे सुरेश ढोमे यांनी हि विद्यालयास २१०००/(अक्षरी एकवीस हजार रुपये मात्र) रोख रक्कम देणगी स्वरुपात दिली.
मा. आमदार दादाभाऊ कळमकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यालयास ई-लर्निंग स्कूल बनविण्यासाठी संस्थेच्या वतीने LCD Proectar य LapTop देण्याचे जाहिर केले. तसेच पुढील शैक्षणिक वर्षात विद्यालयात ज्यूनिअर कॉलेज ऑफ सायन्स सुरु करण्याचे जाहीर केले. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानदेवराव पांडूळे, मा. इन्स्पेक्टर तुकाराम कन्हेरकर, मा. मुख्याध्यापक शिवाजीराव लंके सर, सरपंच अरुणाताई प्रदिप खिलारी पा. सुरेशशेठ धुरपते, पंडितराव झावरे पा,
सुरेशशेठ ढोमे, अंकुशशेठ पायमोडे, दत्ताशेठ निवडूंगे, चंद्रकांत ठुबे, मळीभाऊ रांधवण, सुनिल खिलारी पप्पूशेठ पायमोडे, किरण तराळ, प्रशांत तराळ, मा. मुख्याध्यापक जाधव सर, अनुसंगम शिंदे सर, पर्यवेक्षक अरुण रोहोकले सर, सुभाष खिलारी, एकनाथ झावरे सर, दत्ताभाऊ टेकूडे, संदिप व्यवहारे, आबासाहेब ढ़ेंबरे, बाबासाहेब खिलारी, प्रकाश दुर्गे, संजय दिवटे, नवनाथ गव्हाणे, ज्ञानदेव खमकर
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. दुबे जे.टी. प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक ढुस एस. के शिक्षक मनोगत रोकडे के.टि. आभार आळव ए. पी यांनी केले.
COMMENTS