राज्यस्तरीय कृषीगंगा प्रदर्शनाचे पारनेर येथे उद्घाटन ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाला कृषी प्रदर्शनाचा लाभ : आमदार निलेश लंके पाहिल्याच दिवशी ...
राज्यस्तरीय कृषीगंगा प्रदर्शनाचे पारनेर येथे उद्घाटन
ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाला कृषी प्रदर्शनाचा लाभ : आमदार निलेश लंके
पाहिल्याच दिवशी टिकटॉक फेम दीड टन वजनाचा रेडा प्रमुख आकर्षण
कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी मोठी गर्दी
पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पारनेर व निलेश लंके प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने २३ ते २६ डिसेंबर दरम्यान चार दिवसीय राज्यस्तरीय कृषीगंगा प्रदर्शन पारनेर या ठिकाणी आयोजित केले असून या प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार नीलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रदर्शन उद्घाटन कार्यक्रमात बोलताना आमदार निलेश लंके म्हणाले की शेतकऱ्यांना नवनवीन शेती अवजारांची माहिती व्हावी या उद्देशाने पारनेर सारख्या ग्रामीण भागांमध्ये गेल्या तीन वर्षांपासून कृषी प्रदर्शन भरवून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती पोचविण्याचे व आधुनिक कृषी तंत्रज्ञान साहित्य ग्रामीण विभागात पोहोचविण्यासाठी खऱ्या अर्थाने या कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले जाते.
दरम्यान पारनेर या ठिकाणी भरविण्यात आले कृषीगंगा या कृषी प्रदर्शनात दीडशे ते दोनशे कृषिविषयक दुकानं सह खाऊची दुकाने विविध कंपन्यांचे कृषिविषयक नवीन तंत्रज्ञान कृषीचे नवीन अवजारे विविध कंपन्यांचे ट्रॅक्टर्स, वायु प्रदूषण कमी करण्यासाठी ई बाईक, बॅटरी पंप, पशुखाद्य, सिंचन,सुधारित ठिबक रासायनिक खते, औषधे, सेंद्रिय व रासायनिक खते, ऑटो स्टार्टर महिलांसाठी गृह उपयोगी वस्तू सोलर तंत्रज्ञान दूध काढण्याची मशीन, कुकूटपालन, पतपुरवठा संस्था, महिला बचत गट, या कार्यक्रमासाठी स्टोल धारकांनी यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे. पाहिला दिवशी टिकटॉक फेम दीड टन वजनाचा रेडा या कृषी प्रदर्शनाचा प्रमुख आकर्षण ठरला आहे.
प्रदर्शन स्थळी आलेल्या सर्वांनी रेडा पाहण्यासाठी मोठे गर्दी केली तसेच शाळा कॉलेज च्या विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला भेट दिली कृषी प्रदर्शनाचे व्यवस्थापक बंडू पाचपुते व गणेश जठार यांनी उत्कृष्ट व्यवस्थापन केले आहे.
यावेळी माजी सभापती गंगाराम बेलकर, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष बाबाजी तरटे, ठकाराम लंके, सोमनाथ वरखडे, अशोक घुले, विजय औटी, भाऊसाहेब लामखडे, सुवर्णा घाडगे, पुनमताई मुंगसे, सुधामती कवाद, स्वाती इंगळे, डॉ. बाळासाहेब कावरे, कारभारी पोटपन, जयसिंग मापारी, अनिल गंधाते, शिवाजी शिंदे, विजय डोळ, बंडू गायकवाड, आंनदा ओटी, किसन गंधाडे, आदी उपस्थित होते.
COMMENTS