नगर दक्षिण च्या राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी : ओंकार गुंड अहमदनगर प्रतिनिधी : अहमदनगर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रे...
नगर दक्षिण च्या राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी : ओंकार गुंड
अहमदनगर प्रतिनिधी :
अहमदनगर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या निवडी पार पडल्या राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील जी गव्हाणे यांच्या मान्यतेने उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष विद्यासागर जी घुगे यांनी पत्र देऊन ओंकार गुंड यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड केली. नियुक्तीबाबत बोलताना ओंकार गुंड म्हणाले की, आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने माझ्यावर ती मोठी जबाबदारी दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवून जी जबाबदारी दिली आहे ती मी सार्थ ठरवेल आगामी काळात विद्यार्थ्यांसाठी अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करेल.
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब , महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, आ. रोहित दादा पवार यांच्या विचारानुसार तसेच सुनीलजी गव्हाणे व विद्यासागर घुगे यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करेल. ओंकार गुंड यांनी आत्तापर्यंत विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी काम करत असताना अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवले आहेत त्याच या कामाची पावती म्हणून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली असे त्यांनी बोलताना सांगितले विद्यार्थी वर्गातून आणि ओंकार गुंड मित्रपरिवारतून त्यांचे या निवडीचे स्वागत होत आहे.