पारनेर क्रांती शुगर साखर कारखान्यांने ऊस वाहतूक व तोडणी कामगारांचे पैसे थकविले कामगारांनी केली तक्रार; तक्रारदार उद्या बसणार उपोषणाला पारनेर...
पारनेर क्रांती शुगर साखर कारखान्यांने ऊस वाहतूक व तोडणी कामगारांचे पैसे थकविले
कामगारांनी केली तक्रार; तक्रारदार उद्या बसणार उपोषणाला
पारनेर प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील क्रांती शुगर साखर कारखान्याने म्हसोबा झाप पोखरी येथील ऊस वाहतूक व तोडणी कामगारांचे कष्टाचे पैसे दिले नसल्याने ते कामाचे पैसे मिळण्यासाठी क्रांती शुगर साखर कारखान्याकडे वेळोवेळी मागणी करूनही कामाचे पैसे मिळत नाही त्यामुळे म्हसोबा झाप चे सरपंच प्रकाश गाजरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
क्रांती शुगर कारखान्याच्या ऊस वाहतूक व तोडणी कामगारांची थकीत बिल मिळत नसल्याने बाळू पांडुरंग शिंदे, सुभाष बाबुराव पवार, पांडुरंग देवजी आहेर यांनी तक्रार केली असून क्रांती शुगर कारखान्याच्या गेटला टाळे ठोकून उपोषणाचा इशारा दिला आहे.
थकीत बिल न दिल्यामुळे दि. 22 डिसेंबर रोजी कारखान्यासमोर कामगार व कष्टकऱ्यां समवेत उपोषणाला बसणार असल्याचे म्हसोबा झापचे सरपंच प्रकाश गाजरे यांनी सांगितले.