नगर- स्वतंत्रता सेनानी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आज़ाद यांच्या जयंतीचे निमित्ताने मखदुम सोसायटीच्या वतीने कौमी एकता सप्ताहचे आयोजन करण्यात ...
नगर-
स्वतंत्रता सेनानी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आज़ाद यांच्या जयंतीचे निमित्ताने मखदुम सोसायटीच्या वतीने कौमी एकता सप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त रहेमत सुल्तान फाउंडेशन, मोहंमदीया एज्युकेशन सोसायटी,मुस्कान वेलफेयर एसोसिएशन, अहमदनगर जिला उर्दू साहित्य परिषद,जीवन फाउंडेशन, तंन्जिमे उर्दू अदब, ज्येष्ठ नागरिक संघ मुकुंदनगरच्या सहकार्याने महफिले मुशायर्याचे रहेमत सुलतान सहभागृह येथे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात कुराण पठणाने झाली. यानंतर डॉ.कमर सुरुर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कौमी एकता सप्ताह मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची संपूर्ण सखोल माहिती देऊन आपल्या कवितांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.अनेक मान्यवर शायरांनी ....
बस्ती में अपने हिंदू मुसलमा जो बस गये
ईन्सां की शक्ल देखने को हम तरस गये....
हिंदू ना सिख ईसाई मुसलमान की तरहा
बस्ती में आप रहिये इन्सान की तरहा....
रौशनी का कुछ ना कुछ इमकान होना चाहिए
बंद कमरे में भी रौशनदान होना चाहिए
हिंदू मुस्लिम आप के माथे पे लिखा हो मगर
आप के सिने पे हिंदुस्तान होना चाहिए.....
अशया आपल्या रचना सादर करुन गजल रसिकांची मने जिंकली. देशभक्त शहिदांचे बलिदान, राष्ट्रीय एकात्मता, जीवघेणी महागाई, हिंसाचारात निरपराधांचा मृत्यू, इन्सानियम, मानवतेच्या विरोधात सुरु असलेल्या कारवाया आणि असंवेदशिल राज्यकर्ते, सामान्यांच्या मनात खदखदत असलेल्या अशा देशहिताच्या गंभीर विषयावर शायर्यांनी आपल्या प्रभावी आणि भेदक रचना सादर केल्या. संपूर्ण रहेमत सुलतान सभागृह या शायरीला दिलखुलास आणि अंत:करणपूर्वक दाद देत होते.
मुशायर्याच्या अध्यक्षस्थानी पुणे काॅलेज चे हिंदी विभाग प्रमुख डॉ.मोहंमद शाकीर शेख हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन नाशिक येथील प्रसिद्ध डॉ.लियाकय नामोले, डॉ.आसिफ सैय्यद, सामाजिक कार्यकर्ता शाकिर शेख आदि उपस्थित होते. या मुशायरा मध्ये डॉ.लियाकत नामोले (नासिक) डॉ.आसीफ सैय्यद (नासिक) क़मर ऐज़ाज (औरंगाबाद) कलीम गढबड (मालेगांव) इर्शाद अंजुम (मालेगांव) प्रा.डाॅ.मोहंमद शाकीर(पुणे) बिलाल अहमद,सैय्यद खलील, नफीसा हया, सलीम खान यावर,आसिफ सर, मुन्नवर हुसैन,अब्दुल रशीद कुरैशी आदिंनी आपल्या रचना सादर केल्या.
सूत्रसंचालन इरशाद अंजुम यांनी केले तर आभार सलीम खान यावर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शफकत सैय्यद,आरीफ सैय्यद,नादिर खान,तारीक शेख, निसार बागवान व मखदुम सोसायटीचे सर्व पदाधिकारी व स्थानिक शायरांनी भरपुर परिश्रम घेतले.