नगर- भाविकांचे कुलदैवत असलेल्या पिंपळगावरोठा.ता.पारनेर येथील श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानला चंपाषष्ठी महोत्सव व कोरठण खंडोबा मंदिर सुव...
नगर-
भाविकांचे कुलदैवत असलेल्या पिंपळगावरोठा.ता.पारनेर येथील श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानला चंपाषष्ठी महोत्सव व कोरठण खंडोबा मंदिर सुवर्ण कळसाचा २४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला चंपाषष्ठी निमित्त हजारो भाविकांनी खंडोबाचे दर्शन घेतले
पहाटे ४ वा.स्वयंभू खंडोबा तांदळा मुर्तीला आणि १२ लिंगांना पुजारी देवीदास क्षीरसागर, दत्तात्रय क्षीरसागर, गणपत वाफारे ,रामदास मुळे ,ज्ञानदेव माऊली घुले,विश्वस्त अमर गुंजाळ,शांताराम खोसे यांच्या हस्ते मंगलस्नान घालण्यात आले यानंतर उत्सव मुर्तीचे चांदीच्या सिंहासनाचे व उत्सव मुर्तीचे साजशृंगार करून अनावरण करण्यात आले
पहाटे पाच वा. संतोष दाते व शैला दाते यांच्या हस्ते खंडोबाची प्रथम आरती करण्यात आली यावेळी देवस्थानचे अध्यक्ष अॅड पांडुरंग गायकवाड ,राजाराम मुंढे, संभाजी मुंढे आदी उपस्थित होते खंडोबा म्हाळसा घोड्यावरील पितळी मूर्ती मंदिर व स्वामी गगनगिरी महाराज मुर्ती मंदिरात पुजा आरती सुरेश कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आली सकाळी सहा वा.श्री खंडोबा अभिषेक पुजा व महाआरती विश्वस्त व यात्रा समिती प्रमुख किसन धुमाळ व रोहिणी धुमाळ आणि नगर अर्बन बॅकेच्या उपाध्यक्षा दिप्ती सुवेंद्र गांधी यांच्या हस्ते झाली यावेळी सरचिटणीस महेंद्र नरड विश्वस्त बन्सी ढोमे, सुरेश सुपेकर, बाबाजी जगताप व भाविक उपस्थित होते
सकाळी ७ ते ९ होमहवन यज्ञ,सकाळी ८ ते १० शरद भागवत प्रस्तुत आनंदयात्री भक्ती भजन मंडळ,आळेफाटा यांचा संगीत भजन कार्यक्रम झाला स. ११ च्या दरम्यान गोरेगाव ग्रामस्थांचा दिंडी सोहळा पिंपळगावरोठा वरून खंडोबा देवस्थानजवळ आला उपस्थित भाविकांना सकाळी ११ वाजल्यापासून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले याच दरम्यान गजाजन महाराज काळे यांच्या मल्हारी महात्म खंडोबा कथासार या सुश्राव्य हरिकीर्तनचा भाविकांनी लाभ घेतला
दरम्यान नानाजीभाई ठक्कर ठाणावाला,देवस्थानचे उपाध्यक्ष गंगाराम बेलकर,जि.प.सभापती काशिनाथ दाते, बाजार समिती संचालक शिवाजी बेलकर,मा.सभापती अरूण ठाणगे,सावकार बुचुडे,विश्वस्त मनिषा जगदाळे,हनुमंत सुपेकर,पोलीस निरीक्षक घनश्याम बळप चंपाषष्ठी महोत्सवात उपस्थित होते दुपारी १ वा चांदीच्या पालखीतून शाही रथात चांदीच्या उत्सव मूर्तीची भव्य मिरवणुकीने मंदिर प्रदक्षिणा व कोरठण गड प्रदक्षिणा झाली देणगीदारांच्या सन्मानानंतर पालखीचे व्यासपीठावर आगमन होऊन मान्यवरांच्या उपस्थितीत चंपाषष्ठी उत्सवाची महाआरती झाली
दुपारी श्री खंडोबा गाणी स्पर्धा शाहीर स्वनिल गायकवाड आणि पार्टी तसेच संतोष जाधव,मालन जाधव आणि बालगायक लालेश जागरण पार्टी यांचा सामना झाला पारनेर पोलीस, अहमदनगर पोलीस मित्र संस्था यांनी चोख बंदोबस्त ठेवला जय मल्हार विद्यालयाचे विद्यार्थी ,अळकुटी महाविद्यालयाचे विद्यार्थी,क्रांती शुगर कारखाना सुरक्षा पथक यांनी स्वयंसेवक म्हणून सेवा दिली
फोटो-राज्यातील भाविकांचे कुलदैवत असलेल्या पिंपळगावरोठा(ता.पारनेर)येथील श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानला चंपाषष्ठी उत्सवात सौ.दीप्ती सुवेंद्र गांधी,व्हाईस चेअरमन, नगर अर्बन बँक यांच्या हस्ते अभिषेक व आरती करण्यात आली (छाया-महेश कांबळे)