महापरिनिर्वाण दिना निमित्त डॉ. आंबेडकर यांना अभिवादन टाकळी ढोकेश्वर येथे राबविण्यात आला सामाजिक उपक्रम पारनेर/प्रतिनिधी : टाकळी ढोकेश्वर ये...
महापरिनिर्वाण दिना निमित्त डॉ. आंबेडकर यांना अभिवादन
टाकळी ढोकेश्वर येथे राबविण्यात आला सामाजिक उपक्रम
पारनेर/प्रतिनिधी :
टाकळी ढोकेश्वर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले यावेळी पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक विचारांना ग्रामपंचायत टाकळी ढोकेश्वर येथे अभिवादन करण्यात आले.
यावेळी डॉ. भाऊसाहेब खिलारी, उपसरपंच सुनील चव्हाण सर, अंकुश पायमोडे, श्रावण गायकवाड, संतोष सोनावळे, सचिन अल्हाट, किरण उर्फ रामभाऊ तराळ, निलेश गायकवाड, सुनील थोरात, विकास आल्हाट, बापू रांधवण , संकेत झावरे, गणेश शिरतार, सर्व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी डॉ. भाऊसाहेब खिलारी म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या संपूर्ण भारत देशाला संविधान दिले
त्यांच्या सामाजिक विचारांना आदर्श ठेवून आपण सर्वजण काम करत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक वैचारिक विचार आपण सर्वांनी जोपासले पाहिजे व त्यांच्या कार्याचा आदर्श घेतला पाहिजे आज त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपण त्यांच्या कार्याला अभिवादन करूया
यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक श्रावण गायकवाड यांनी उपस्थित सर्व ग्रामस्थांचे व पत्रकार बंधूंचे आभार मानले.
आजच्या दिवशी विश्वशांतीदूत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक विचारांचा आपण सर्वांनी आदर्श घ्यावा असे ते म्हणाले.
दरम्यान यावेळी विकास अल्हाट यांनी शाळकरी विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके तसेच शालेय वस्तूंचे महापरिनिर्वाण दिनानिमित्त वाटप करत एक चांगला सामाजिक आदर्श घालून दिला व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक विचारांना अभिवादन केले.
COMMENTS