वेब टीम : अहमदनगर केडगाव हत्याकांड प्रकरणात आरोपी असलेल्या माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांना अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामि...
केडगाव हत्याकांड प्रकरणात आरोपी असलेल्या माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांना अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामिन अर्ज मंजूर करण्यात आल्याची माहिती आहे. गुरूवारी अटकपूर्व जामीन अर्जावर जिल्हा व सत्र न्यायाधीश कुरतडीकर यांनी निकाल दिला.
केडगाव येथे सुमारे तीन वर्षापूर्वी दोन शिवसैनिकांची हत्या झाली होती. या हत्याकांडात आरोपी म्हणून माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांचा समावेश आहे. हत्येपासून आरोपी सुवर्णा कोतकर फरार होती. आरोपी कोतकरने २ जानेवारीला जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता.
या अर्जावर सीआयडी आणि सरकारी वकिलांनी म्हणणे मांडले असता मंगळवारी या प्रकरणाची सुनावणी झाली होती. दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सुवर्णा कोतकरला काही अटींवर अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र सोडायचा असल्यास परवानगी घ्यावी, पासपोर्ट जमा करावा, या अटींवर न्यायालयाने एक लाख रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. आरोपी सुवर्णा कोतकरच्यावतीने न्यायालयात अॅड. विवेक म्हसे आणि अॅड. महेश तवले, ऍड सागर वाव्हळ यांनी बाजू मांडली.
COMMENTS