वेब टीम: हैदराबाद सुपरस्टार अल्लू अर्जुनचा चित्रपट ‘पुष्पा: द राईस’ने बॉक्स ऑफिसवर चांगलीच धुमाकूळ घातली आहे. काही दिवसांमध्येच पुष्पाने ५...
सुपरस्टार अल्लू अर्जुनचा चित्रपट ‘पुष्पा: द राईस’ने बॉक्स ऑफिसवर चांगलीच धुमाकूळ घातली आहे.
काही दिवसांमध्येच पुष्पाने ५० कोटींच्या क्लबमध्ये एंट्री घेतली आहे. तिसऱ्या आठवड्यातही पुष्पाने हिंदी प्रेक्षकांमध्ये तिची जादू कायम ठेवली आहे.
ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विट करून पुष्पाच्या कमाईचे आकडे शेअर केले आहेत.
त्याने लिहिले, “पुष्पाने 50 कोटी कमावले आहेत. चित्रपटाची बक्कळ कमाई होत आहे. तिसर्या आठवड्यात नववर्ष सेलिब्रेशन आणि ओपन वीकचा फायदा पुष्पाला झाला आहे.
हा चित्रपट अटळ आहे. तिसऱ्या आठवड्यात शुक्रवारी चित्रपटाने 3.50 कोटींची कमाई केली. भारतीय बाजारात या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 50.59 कोटी आहे. हे आकडे चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीतील आहेत.” असे त्यांनी सांगितले.