कोरोना वेब टीम : मुंबई आज दिवसभरात राज्यात ९ हजार १७० नवीन करोनाबाधित आढळल्याचे समोर आले आहे. राज्यात आज 7 कोरोना रुग्णांचा मृत्युही झाला आह...
कोरोना |
आज दिवसभरात राज्यात ९ हजार १७० नवीन करोनाबाधित आढळल्याचे समोर आले आहे.
राज्यात आज 7 कोरोना रुग्णांचा मृत्युही झाला आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत चालल्याने पुन्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. प्रशासनाकडून निर्बंध आणखी कडक करण्यात येण्याची शक्यता आहे.
मुंबईत ६ हजार ३४७ नव्या करोनाबाधितांची आज नोंद झाली आहे. याशिवाय राज्यात आज सात करोनाबाधित रूग्णांचा तर मुंबईत एका करोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ टक्के एवढा आहे.
राज्यात आज दिवसभरात 6 ओमायक्रॉन रूग्ण आढळले आहेत. पुणे ग्रामीणमध्ये 3, पिंपरी-चिंचवडमध्ये 2 तर पुणे महापालिका हद्दीत एक रूग्ण आढळून आला आहे. त्यामुळे राज्यातील ओमायक्रॉन रूग्णांची संख्या 460वर जाऊन पोहचली आहे.
तर, आज राज्यात १ हजार ४४५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ६५,१०,५४१ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिक्व्हरी रेट ) ९७.३५ टक्के एवढे झाले आहे.
लॉकडाऊन बद्दल राजेश टोपे म्हणाले…
दरम्यान लॉकडाऊनचा परिणाम अर्थकारणावर होतो. लॉकडाऊनची झळ प्रत्येकाला बसली आहे. जान है तो जहान है. त्यामुळे लोकांची काळजी घेणं, यालाच आमचं पहिलं प्राधान्य असणार आहे. कठोर निर्णय घ्यावे लागले, तर घेऊच.
पण एक नक्की आहे, निर्बंध पहिलं पाऊल असतं. लोकांनी ते पाळले, तर परिस्थिती नियंत्रणात येईल, असा विश्वास टोपे यांनी बोलताना व्यक्त केलाय.आज एक टप्पा आपण ठरवून दिलेला आहे.
मर्यादा घातलेल्या आहेत. गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी निर्बंध लादण्यात आलेले आहे. त्याचा परिणाम एक दोन दिवसात दिसेल. यावरुन नियंत्रणात आलं, तर ठीक, नाहीतर अधिक कठोर निर्णय घ्यावे लागतील, असंदेखील पत्रकारांशी बोलताना राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
COMMENTS