अहमदनगर (प्रतिनिधी)- पाथर्डी तालुक्यातील धनगरवाडी येथील गणेश पवार याची नवी मुंबई येथे झालेल्या पोलीस भरती मध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचा स...
अहमदनगर (प्रतिनिधी)-
पाथर्डी तालुक्यातील धनगरवाडी येथील गणेश पवार याची नवी मुंबई येथे झालेल्या पोलीस भरती मध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सोमनाथ पवार, दादासाहेब पांडुळे ,सावली दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे, बाळासाहेब पवार, योगेश काळे आदी उपस्थित होते.
यावेळी सोमनाथ पवार म्हणाले की, धनगरवाडी येथील गणेश पवार यांचे वडील ऊसतोड कामगार असल्याने घरची परिस्थिती हलाखीची असल्याने गणेश पवार यांने मेहनत व जिद्दीने आपण यशस्वी होणाऱ्या हेतुने मेहनत घेऊन आज ऊस तोडणी कामगाराचा मुलगा पोलीस झाल्याचा अभिमान असल्याने त्याचा सन्मान करण्यात आला. या निवडीबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
COMMENTS