संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन दिनदर्शिकेचे प्रकाशन सचिन पाटील वराळ व त्यांच्या सहकार्यांचे काम कौतुकास्पद निघोज सोसायटीचे माजी अध्यक्ष व...
संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन दिनदर्शिकेचे प्रकाशन
सचिन पाटील वराळ व त्यांच्या सहकार्यांचे काम कौतुकास्पद
निघोज सोसायटीचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ ग्रामस्थ विठ्ठलराव वरखडे
पारनेर/प्रतिनिधी :
संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनच्या माध्यमातून गेली पाच वर्षात मोठ्या प्रमाणात विकासकामे मार्गी लागली आहे. फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ व त्यांच्या सहकार्यांचे काम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन निघोज सोसायटीचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ ग्रामस्थ विठ्ठलराव वरखडे महाराज यांनी व्यक्त केले आहे.
संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन संचलित दिनदर्शिकेचे प्रकाशन ज्येष्ठ ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी वरखडे महाराज बोलत होते. तंटामुक्ती समितीने अध्यक्ष मंगेश लाळगे, संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ, किशन कन्हैया दूध उद्योग समूहाचे अध्यक्ष शिवाजीराव लंके, दिनदर्शिकेचे संपादक आप्पासाहेब वराळ, जयदीप सालके, सुभाष वराळ, मेजर विकास वराळ, सुनिल वराळ, युवा नेते रवि लाळगे, बाळासाहेब वरखडे, भास्करराव वराळ पाटील, भिमराव लामखडे, राहुल वराळ, मनोहर दिवसे, दत्तात्रय राऊत, जितेंद्र राऊत, बशीरभाई मोमीन, अस्लमभाई इनामदार, मंगेश वराळ, तलाठी सुनिल उचाळे, संतोष ढवण, नवनाथ ढवण, स्वप्नील आतकर, निलेश घोडे, रामदास उचाळे, श्रीकांत लामखडे, शैलेश वराळ, नामदेव पांढरकर, समीर ढवळे, सुनिल वरखडे ग्रामस्थ मोठ्या संख्याने उपस्थित होते.
यावेळी बोलतांना आप्पासाहेब वराळ म्हणाले, गेली चार वर्षांपासून संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनच्या सहकार्याने ही दिनदर्शिका दरवर्षी प्रसिद्ध होत असते. गावोगावचे उत्सव, वाढदिवस, जिल्हा परिषद, पंचायत समिती, निघोज ग्रामपंचात यामाध्यमातून झालेल्या निवडक कामांची माहिती तसेच संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन माध्यमातून झालेल्या सामाजिक कामांची माहिती यामध्ये प्रसिद्ध केली आहे. दहा हजार कुटुंबापर्यंत ही दिनदर्शिका पाठवण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.
तंटामुक्ती समीतीचे अध्यक्ष मंगेश लाळगे यांनीही संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनच्या दिनदर्शिकेचे कौतुक करत सामाजिक काम व विकासकामे लोकांना माहिती झाले पाहिजे त्यातूनच आजच्या युवापिढीला सामाजिक कार्याची प्रेरणा मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे पदाधिकारी निलेश घोडे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. राहुल वराळ यांनी आभार मानले.