टाकळी ढोकेश्वर येथे मंगळवारी मूळव्याध तपासणी शिबिर राष्ट्रवादी काँग्रेस व निलेश लंके प्रतिष्ठानचा सामाजिक उपक्रम बाळासाहेब खिलारी व सरपंच प्...
टाकळी ढोकेश्वर येथे मंगळवारी मूळव्याध तपासणी शिबिर
राष्ट्रवादी काँग्रेस व निलेश लंके प्रतिष्ठानचा सामाजिक उपक्रम
बाळासाहेब खिलारी व सरपंच प्रकाश गाजरे यांनी शिबिराचा लाभ घेण्याचे केले आव्हान
पारनेर प्रतिनिधी :
टाकळी ढोकेश्वर येथे मंगळवार दि. 18 जानेवारी 2022 रोजी टाकळी ढोकेश्वर गटातील ग्रामस्थांसाठी मुळव्याध भगंदर तपासणी शिबिराचे आयोजन निलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आले असल्याची माहिती निलेश लंके प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बाळासाहेब खिलारी म्हसोबा झापचे सरपंच प्रकाश गाजरे यांनी दिली आहे.
अहमदनगर येथील साईलीला हॉस्पिटल चे मुळव्याध तज्ञ डॉ. संजय शिंदे व डॉ. वनिता शिंदे यांच्या माध्यमातून आमदार निलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या संयुक्त विद्यमाने हे तपासणी शिबिर टाकळी ढोकेश्वर येथे कोरोनाचा नियमांचे पालन करत आयोजित करण्यात आले.
या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी सुपा जिल्हा परिषद गटाच्या सदस्या राणीताई निलेश लंके, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रदेशाध्यक्ष जितेश सरडे, राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा राजेश्वरीताई कोठावळे तसेच टाकळीढोकेश्वर गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे व निलेश लंके प्रतिष्ठान चे सर्व प्रमुख पदाधिकारी हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
या शिबिराचा लाभ घेण्याचे आव्हान सरपंच प्रकाश गाजरे यांनी केले आहे.
COMMENTS