टाकळी ढोकेश्वर, वासुंदे, वडगाव सवताळ, भाळवणी, परिसरात जनजीवन गारठले; बळीराजा चिंतेत पारनेर/प्रतिनिधी : गेल्या तीन दिवसापासून ढगाळ वाताव...
टाकळी ढोकेश्वर, वासुंदे, वडगाव सवताळ, भाळवणी, परिसरात जनजीवन गारठले; बळीराजा चिंतेत
पारनेर/प्रतिनिधी :
गेल्या तीन दिवसापासून ढगाळ वातावरणसह थंडीने चांगलाच जोर पकडला असून टाकळी ढोकेश्वर परिसर अक्षरशः थंडीने गारठला आहे. तसेच परिसरात धुक्याची चादर पसरल्याचेही चित्र पहावयास मिळत आहे. तसेच कालपासून सूर्याचे दर्शनही झाले नाही. नागरिकांनी उबदार कपडे परिधान केले आहे. या वाढत्या थंडीने सर्दी, खोकला, तापाचे रूग्ण वाढण्याची शक्यता आहे. थंडी गहू, हरभरा व अन्य पिकांना पोषक असली तरी ढगाळ हवामानामुळे शेतकर्यांची चिंताही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या पुर्वसुचनेनुसार हवामानात बदल झाला असून नगर जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. तसेच दिवसभर ढगाळ वातावरण आहे. सकाळी कमीअधिक प्रमाणात धुक्याचा प्रभाव होत आहे, तर थंड हवेचे झोत दिवसभर टिकून आहेत. या वातावरणाने मानवी जीवन गारठून गेले आहे. तर पशुपक्ष्यांनाही याचा चांगलाच फटका बसल्याचे पहावयास मिळत आहे. गारठ्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या वातावरणाचा जनजीवनावर परिणाम झाला आहे.
पिकांनाही या वातावरणाचा मोठा फटका बसत आहे. नव्यानेच लागवड झालेल्या कांदा पिकांना धोका होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तर खरिप पिकांवर रोगकीडीचा प्रादुर्भाव होता तो अजून वाढण्याचे संकेत शेतीतज्ञांनी दिले आहेत. दिवसेंदिवस होणाऱ्या हवामान बदलाने पिकपध्दतीत बदल करण्याची वेळ सध्या शेतकऱ्यांवर आली असून हंगामानिहाय पिकपध्दत आता या हवामान बदलाने कालबाह्य होत आहे की काय अशी शंका बळीराजा व्यक्त करत आहे. गेल्या चार ते पाच वर्षात उशिरा पावसाचे आगमन होत असून थंडीचा मोसमही उशिरा येत आहे.
पर्यायाने या बदलाचा पारंपरिक पिकपध्दतीवर अनिष्ट परिणाम होत असून उत्पन्नात कमालीची घट होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला नेहमीच सामोरे जावे लागत आहे. एकूणच सध्या हवामान बदलाने जनजीवन अक्षरशः गारठले असल्याचे चित्र असून येत आहे
COMMENTS