अमोल साळवे यांचा वाढदिवस युवक महोत्सव ठरावा भुमिपुत्र शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर अमोल साळवे यांना भूमिपुत्र शेतकरी संघटनेच...
अमोल साळवे यांचा वाढदिवस युवक महोत्सव ठरावा
भुमिपुत्र शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर
अमोल साळवे यांना भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा
पारनेर प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या टाकळी ढोकेश्वर गणाच्या कार्यक्षम पंचायत समिती सदस्या सौ सुप्रिया अमोल साळवे यांचे पती सामाजिक कार्यकर्ते अमोल साळवे सर यांचा वाढदिवस मंगळवार ११ जानेवारीला टाकळी ढोकेश्वर येथील प्रियदर्शनी पब्लिक स्कूल मध्ये सायंकाळी सात वाजता साजरा होत आहे.
युवकांच्या गळ्यातील ताईत असलेले अमोल साळवे सर हे नेहमी समाजाच्या व युवकांच्या संपर्कात असणारे सर्वसामान्य नेतृत्व आहे. त्यांनी समाजासाठी केलेले काम हे समाज परिवर्तन करणारे ठरले आहे. कोरोनाच्या काळात त्यांनी जे काम उभे केले ते सर्वसामान्य जनतेला आधार देणारे ठरले असून अमोल साळवे सर यांचा वाढदिवस हा खऱ्या अर्थाने युवक महोत्सव ठरावा असे प्रतिपादन भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर यांनी केले.
नेहमी समाजाच्या सुख दुःखामध्ये सहभागी असलेले अमोल साळवे सर हे आपल्या युवा सहकाऱ्यांच्या अडीअडचणी मध्ये तेवढ्याच तत्परतेने पुढे असतात आपला युवा सहकारी हा रोजगाराभिमुख बनला पाहिजे यासाठी अमोल साळवे सर हे नेहमी प्रयत्न करत असतात.
भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर यांनी आज सायंकाळी अमोल साळवे सर यांचा सन्मान करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वाढदिवस हा खऱ्या अर्थाने एक सामाजिक दृष्टिकोनातून साजरा केला जावा युवकांना प्रेरणा देणारा हा वाढदिवस ठरावा अशी अपेक्षा यावेळी वाडेकर यांनी व्यक्त केली.
सामाजिक कार्यकर्ते युवा नेतृत्व अमोल साळवे सर यांचा यावेळी सन्मान करण्यात आला यावेळी पारनेर पंचायत समितीचे माजी सभापती दीपक आबा पवार टाकळी ढोकेश्वर येथील मराठा महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष किरण उर्फ रामभाऊ तराळ, सुपा येथील वैभव काळे, भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे तालुका संघटक महेश झावरे, मीडिया प्रभारी पत्रकार गणेश जगदाळे, चेअरमन संजय भोर, भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे तालुका संघटक संजय भोर, पांडुरंग दरेकर, उत्तम भोर, देसवडे उपसरपंच सचिन भोर, शंकर टेकुडे, टाकळी ढोकेश्वर येथील वैभव पायमोडे तसेच कर्जुले हर्या येथील प्रवीण आंधळे व अमोल साळवे मित्र परिवारातील अनेक सहकारी यावेळी उपस्थित होते.
COMMENTS