ढवळपुरी येथे आज शाळा खोल्यांचे भूमिपूजन सुजीत झावरे पाटील यांच्या प्रयत्नातून शाळा खोल्या मंजूर पारनेर प्रतिनिधी: तालुक्यातील ढवळपुरी येथील ...
ढवळपुरी येथे आज शाळा खोल्यांचे भूमिपूजन
सुजीत झावरे पाटील यांच्या प्रयत्नातून शाळा खोल्या मंजूर
पारनेर प्रतिनिधी:
तालुक्यातील ढवळपुरी येथील आदिवासी पट्ट्यातील गावडेवाडी येथे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नवीन दोन शाळा खोल्या रक्कम १८ लक्ष रुपये मंजूर करण्यात आल्या असून या शाळा खोल्यांचा भूमिपूजन समारंभ सोमवार दि. ३ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता सुजीत झावरे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे.
दरम्यान सुजीत झावरे पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक विकास कामे मार्गी लावली असून तालुक्यात वाडी वस्तीवर अंगणवाडी तसेच शाळा खोल्या बांधल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तालुक्यात विकास कामे करताना प्राथमिक शिक्षण हे सर्व घटकांना मिळाले पाहिजे ही भूमिका घेऊन सुजीत झावरे पाटील हे तालुक्यात व शिक्षण व्यवस्थेत काम करत आहेत मुलींच्या शिक्षणाची ज्योत ज्यांनी पेटवली त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त हा कार्यक्रम ढवळपुरी येथे होत आहे.
या कार्यक्रमासाठी कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सुजीत झावरे पाटील मित्र मंडळ व ढवळपुरी सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य चेअरमन व्हा. चेअरमन सर्व संचालक तथा समस्त ग्रामस्थ ढवळपुरी यांनी केले आहे.